Water Metro in India Dainik Gomantak
गोवा

Water Metro: गोव्यात लवकरच धावणार 'वॉटर मेट्रो'! IWAI च्या बैठकीत निर्णय; चाचपणी सुरु

Water Metro In Goa: मंडळाने देशातील १२ राज्यांमधील १७ शहरांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः जल मेट्रो सुरू करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्याचे ठरवले आहे.

Sameer Panditrao

Goa Water Metro News

पणजी: राज्यांतील नद्यांचा वापर करून जल मेट्रो सुरू करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे. भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या (आयडब्ल्यूएआय) संचालक मंडळाने त्यांच्या १९६व्या बैठकीत, देशातील विविध शहरांमध्ये शहरी जल वाहतूक प्रणाली विकसित करण्यातील व्यवहार्यतेसंदर्भातील अभ्यास सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यात गोव्याचा समावेश आहे.

मंडळाने देशातील १२ राज्यांमधील १७ शहरांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः जल मेट्रो सुरू करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्याचे ठरवले आहे. हा व्यवहार्यताविषयक अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल्वे (केएमआरएल) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे सध्याच्या नौवहन-योग्य असलेल्या जलमार्गांचा वापर करून मजबूत आणि टिकाऊ शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. हे जल मेट्रो मॉडेल शहरी जल वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणणारे ठरणार असून त्यायोगे वाहतुकीच्या पारंपरिक पद्धतींना पर्याय ठरणारे सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरण-स्नेही पर्याय उपलब्ध होतील.

जलमार्ग मंत्रालयाशी सल्लामसलत करून आयडब्ल्यूएआयने गोव्यासह अयोध्या, कोलकाता, प्रयागराज, पाटणा, श्रीनगर, वाराणसी, मुंबई, वसई, मंगलोर, अहमदाबाद या शहरांची आणि जेथे बेटांतर्गत फेरी सेवांमुळे संपर्क व्यवस्थेत स्थित्यंतर घडून येऊ शकेल अशी केरळमधील अल्लेप्पी तसेच लक्षद्वीप तसेच अंदमान आणि निकोबार बेटांची निवड केली आहे.

प्रदूषणविरहित प्रणाली!

शहराचा मुख्य भाग आणि परिसरातील महानगरपालिका/ पंचायत क्षेत्रे/बेटे यांना ही शहरी जल वाहतूक प्रणाली जलमार्गाने जोडेल आणि या प्रणालीचे वाहतुकीच्या इतर मार्गांसोबत एकत्रीकरण देखील करण्यात येईल. तसेच ही प्रणाली पर्यटन आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला देखील चालना देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Sharma: दीप्ती शर्मा रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्डही धोक्यात

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT