Goa Accident: चोर्ला घाटात लॉरी दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू, एक जखमी; 12 तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश

Chorla Ghat Accident: चोर्ला घाट येथे बुधवारी पहाटे भीषण अपघातात प्लायवूडने भरलेली आंध्रप्रदेश नोंदणीची लॉरी खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: चोर्ला घाट येथे बुधवारी पहाटे भीषण अपघातात प्लायवूडने भरलेली आंध्रप्रदेश नोंदणीची लॉरी खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना पहाटे ४ दरम्यान वाइल्डेस्ट रिसॉर्टजवळ घडली. घाटातील उतरणीवर वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला.

लॉरी पूर्णपणे प्लायवूडने भरलेली असल्याने केबिन चेंगराचेंगरीत होऊन दोघेही आत अडकले. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास अपघात आल्यानंतर पोलिस व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे जखमीला उपचारासाठी हलविण्यात आले.

Goa Accident
Goa Happiness Index: 'गोव्यातील लोक आनंदी जीवन जगत आहेत'! 'हॅपिनेस इंडेक्स' वाढल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

सुमारे ३० जणांच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवत तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला. दरीतील अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत जोखमीचे ठरले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोहम मळीक करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत दोन्ही व्यक्तींची संपूर्ण ओळख पटलेली नव्हती.

Goa Accident
Goa Milk Price: दुधावरील आधारभूत किंमत वेळेत द्या! उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी

‘अग्निशमन’चे बचावकार्य

या बचावकार्यात वाळपई, डिचोली, फोंडा व पणजी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले होते. सत्तरीचे मामलेदार धीरेन बाणावलीकर, संयुक्त मामलेदार विष्णू राणे, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस आदीनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचे समन्वयन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com