Banglore Metro Project Phase II: बाह्य रिंग रोड ते इब्बालूर सरकारी शाळेपर्यंत बॅरिकेड्स; 45 दिवस राहणार मंद वाहतूक

Banglore Metro Project: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये सध्या मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. यामुळे बंगळुरुवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Banglore Metro Project Phase II
Banglore Metro Project Phase IIDainik Gomantak
Published on
Updated on

Banglore Metro Project Phase II: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये सध्या मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. यामुळे बंगळुरुवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या टप्प्यातील आऊटर रिंग रोड सर्व्हिस रोडवरील काम सुरु होणार आहे. जे तब्बल 45 दिवस चालणार आहे. त्यासाठी प्रशासनाने बुधवारी (19 फेब्रुवारी) ट्रॅफिक ॲडवायझरी काढून याबाबतची माहिती दिली. 45 दिवस काम चालणार असल्याने वाहतूक मंद होऊ शकते, ज्यामुळे बंगळुरुवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. बाह्य रिंग रोड ते इब्बालूर सरकारी शाळेपर्यंत बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत, असे ॲडवाझरीमध्ये सांगण्यात आले आहे.

वाहतूक कोडींचा त्रास

बंगळुरु मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) द्वारे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामामुळे HSR लेआउट जवळील उड्डाणपूल अचानक बंद करण्यात आल्याने बुधवारी (12 फेब्रुवारी) बंगळुरुमधील प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला होता. बंगळूरु वाहतूक पोलिसांनी 'एक्स' वर एक सूचना जारी करत याबाबत माहिती दिली होती. "एचएसआर लेआउटमधील 14व्या मेनजवळ बीएमआरसीएलच्या स्लाइडिंग गर्डलमध्ये बिघाड झाल्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे आणि म्हणूनच प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिल्क बोर्डकडे जाणारी वाहतूक 19व्या मेनमार्गे वळवण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

Banglore Metro Project Phase II
Delhi Metro Viral Video: 'अंग लगा दे रे'! दिल्ली मेट्रोमध्ये तरुणी झाल्या रोमँटिक; पाहा व्हिडिओ

कृपया सहकार्य करा अन् प्रवासाची योजना बनवा

"कृपया सहकार्य करा आणि आपल्या प्रवासाची योजना करा," असे पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले होते. मात्र अचानक उड्डाणपूल बंद केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बांधकाम शनिवारी किंवा रात्रीच्या वेळी का केले नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com