Metro In Goa: गोव्‍यातली शहरे मेट्रोने जोडण्‍याचे स्वप्न होणार साकार, केंद्राकडून 482 कोटींची तरतूद

Goa Railway Budget 2025: अर्थसंकल्पात गोव्याला रेल्वेसाठी ४८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय गोव्यात रेल्वेच्या विकासासाठी एकूण ५६९६ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
Goa Metro News
Goa metro updatesCanva
Published on
Updated on

Goa railway budget 2025 investment and metro connectivity

सासष्टी: यंदाच्या अर्थसंकल्पात गोव्याला रेल्वेसाठी ४८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय गोव्यात रेल्वेच्या विकासासाठी एकूण ५६९६ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या व्‍हर्च्युअल पत्रकार परिषदेत दिली. दरम्‍यान, यामुळे गोव्‍यातील मुख्‍य शहरे मेट्रोने जोडण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोव्‍यासह कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या दाक्षिणात्य राज्यांतील रेल्वेच्‍या कामांसाठी करण्‍यात आलेल्‍या तरतुदींची माहिती अश्‍विनी वैष्णव यांनी दिली. ते म्‍हणाले, कर्नाटकसाठी ७५६४ कोटी, केरळसाठी ३४३२ कोटी तर तामिळनाडूसाठी ६६२६ कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे. पूर्वी अर्थसंकल्पानंतर रेल्वेसाठी नवीन प्रकल्पांची, योजनांची सुरवात होत असे. पण आता वर्षभर कामे सुरूच असतात. नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी देशभरात ४० हजार कोटींची तरतूद करण्‍यात आल्‍याचे ते म्‍हणाले.

Goa Metro News
Metro In Goa: गोव्यातील शहरे जोडण्यासाठी 'मेट्रोचा' आराखडा तयार! 5 हजार कोटी खर्च अपेक्षित

गोव्‍यात यावर्षी रेल्वे साधनसुविधांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यात नवीन रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. सध्‍या सां जुझे द आरियाल येथे लहान स्टेशन उभारण्याचे काम सुरू असल्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे कार्यकारी संचालक जोसेफ जॉर्ज यांनी सांगितले. शिवाय रेल्वे रस्त्यांचे दुपदरीकरण, उड्डाणपूल, रेल्वे ट्रॅक खालून रस्ते, रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण, दुरुस्ती, प्रवाशांची सुरक्षा आदींचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. रावणफोंड येथील उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

Goa Metro News
Metro In Goa: गोव्यात मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

रेल्वेस्थानकांचा करणार विकास

देशात पुढील चार वर्षांत एकूण १३०० रेल्वेस्थानकांचा ‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत विकास केला जाईल. त्यात गोव्यातील मडगाव, सावर्डे व वास्को रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, गरज नसलेली बांधकामे हटविणे, चांगली डिझाईन केलेले सूचना फलक लावणे, लोकांना चालण्यासाठी रस्ते तयार करणे, पार्किंगची सुविधा, विद्युतीकरण व विद्युतरोषणाईचा समावेश आहे, अशी माहिती कोकण रेल्‍वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com