Team India Semi Final Scenario: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वेस्ट इंडिजचा विजय भारतासाठी धोक्याची घंटा? सेमीफायनलचं समीकरण आता 'करो या मरो'!

World Cup Semi Final Scenario: वेस्ट इंडिजच्या विजयामुळे ग्रुप 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होऊ शकतात.
Team India Semi Final Scenario
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Team India Semi Final Scenario: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र राहिली. लीग स्टेजमध्ये भारताने सलग चार सामने जिंकून दिमाखात सुपर-8 मध्ये धडक मारली होती. मात्र, सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या गणिताला मोठा फटका बसला.

आता भारताला स्वतःच्या कामगिरीसोबतच इतर संघांच्या निकालांवर आणि धावगतीवर (नेट रन रेट) अवलंबून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत 26 फेब्रुवारी रोजी होणारा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना भारतीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या सामन्यात जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला, तर टीम इंडियाच्या अडचणीत मोठी भर पडू शकते. वेस्ट इंडिजच्या विजयामुळे ग्रुप 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होऊ शकतात. अशा वेळी ज्या दोन संघांचा नेट रन रेट सर्वोत्तम असेल, तेच संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता, ज्यामुळे भारताचा नेट रन रेट सध्या खूपच खालावलेला आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज जिंकल्यास भारताला आपले उरलेले दोन सामने केवळ जिंकावेच लागणार नाहीत, तर ते मोठ्या फरकाने जिंकून आपला रन रेट सुधारण्याचे कठीण आव्हान पेलावे लागेल.

Team India Semi Final Scenario
Team India Qualification Scenario: सेमीफायनलच्या शर्यतीत ट्विस्ट! आफ्रिकेचा सामना ठरणार टर्निंग पॉइंट; टीम इंडियाचं भवितव्य अधांतरी

दुसरीकडे, जर आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग सुकर होऊ शकतो. आफ्रिकेच्या विजयामुळे गुणतालिकेतील गणिते भारताच्या (India) बाजूने झुकतील आणि त्यानंतर वेस्ट इंडिज व झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे दोन सामने जिंकून भारत थेट सेमीफायनलमध्ये धडक मारु शकेल. दक्षिण आफ्रिकेचा विजय भारताला धावगतीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा ठरेल.

Team India Semi Final Scenario
Team India Controversy: विराटच्या कसोटी निवृत्तीचं 'गंभीर' कनेक्शन? 'RO-KO'ला वनडेतून डच्चू देण्याची तयारी? 'कोल्ड वॉर'वर 'BCCI'चा मोठा खुलासा

सध्याची स्थिती पाहता, भारतीय क्रिकेट चाहते आणि खेळाडू या दोघांच्या नजराही 26 फेब्रुवारीला होणाऱ्या आफ्रिका-वेस्ट इंडिज लढतीकडे लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपला फॉर्म कायम राखत वेस्ट इंडिजला रोखले तर भारतासाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल. मात्र, वेस्ट इंडिजने अनपेक्षित निकाल लावला तर टीम इंडियाला (Team India) पुढच्या प्रत्येक चेंडूवर धावगतीचे गणित मांडत मैदानात उतरावे लागेल. त्यामुळे आजचा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून भारताच्या वर्ल्ड कपमधील भवितव्याचा फैसला करणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com