Water tanker  Dainik Gomantak
गोवा

Sacorda News : साकोर्डा भागात पाणी समस्या जटील; टॅंकरवर भिस्त

प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर; उद्या उद्‍घाटन शक्य

दैनिक गोमन्तक डिजिटल

साकोर्डा पंचायत क्षेत्रातील सुर्ला, मधलावाडा, बोळकर्णे, बाराभूमी हायस्कूल परिसर, बोट्टर, तयडे व धारगे गावातील लोकांना नळाद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्याची समस्या जटील झाली आहे. सुर्ला व मधलावाडा गावे वगळता इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

दरम्यान,येथील पाणी प्रकल्पाचेबांधकाम पूर्णत्वास आले असून उद्या बुधवार (ता.१०) रोजी सकाळी प्रकल्पाच्या उद्‍घाटनाची शक्यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यासाठी प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात जलसाठा घटत असल्याने पाणी समस्या उद्भवत असते. या भागातील पाण्याची समस्या साकोर्डा येथे ४ कोटी रुपये खर्चून १ एमएलडी प्रकल्प बांधकामाचा प्रारंभ २० ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते केला होता. सध्या प्रकल्प उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

जलवाहिनी टाकण्याची काम पूर्ण

साकोर्डा पंचायत क्षेत्रातील विविध गावांत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच जॅक वेल , जलकुंभ व जलशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहेत. किरकोळ काम बाकी असून ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी कामगार व तांत्रिक कामगारांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पामुळे संबंधित गावातील लोकांना पूर्णवेळ शुध्द पाणी पुरवठा होणार असल्याने गावातील लोकवस्ती पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत संतुष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT