वर्षभर ‘तोरींग’ फळ देणारे पपनस झाड राय गावात !

अर्थार्जनाचे साधन : फ्रान्सिस्को,सेलिना दाम्पत्याकडून संगोपन
Francisco Barboza and Celina Quadros
Francisco Barboza and Celina QuadrosDainik Gomantak

प्रत्येक फळाची निर्मिती त्या त्या मोसमात किंवा विशिष्ट मातीत होत असते. पण मनोरा राय येथील फ्रांसिस्को बार्बोजा व सेलिना क्वाद्रोस यांच्या मालकीच्या जागेत पपनसचे झाड आहे, ते गेली वर्षभर ही दिवस ‘तोरींग’ हे फळ देत आहे.

गेली 12 वर्षे अखंडितपणे ही प्रक्रिया सुरू आहे. याचे श्रेय फ्रांसिस्को व सेलिना या दांपत्याला द्यावे लागेल. कारण या दोघांनी आपल्या या जागेत पपनसची झाडे लावलेली आहेत. त्यांची काळजी एखाद्या बालकाप्रमाणे ती घेत असतात. या फळ विक्रीमुळे या दापंत्याला उपजिविकेसाठी पुरेशी आर्थिक मदतही होते.

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रम मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये ‘पोमेलो’ असे म्हणतात.

Francisco Barboza and Celina Quadros
Dead Body Found At Baga : बागा येथील खाडीत आढळला तरंगता मृतदेह; अधिक तपास सुरू

गोव्यात नारळ व चिकूचे उत्पादन 365 ही दिवस होत असते. काही झाडे दहा महिने फळे देतात. पण मनोरा राय येथील या पपनस झाडाला निसर्गाचे वरदान लाभले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणारे नाही.

या झाडाला हे दांपत्य केवळ सेंद्रिय खताचा वापर करतात. अशा प्रकारची अनेक पपनस झाडे राय भागात आहेत जी ठराविक फळे देतात. पण फ्रांसिस्को व सेलिनाच्या जागेतील या झाडाची निर्मिती व वैशिष्ट्य खास आहे.

दहा वर्षे एकही फळ येत नसल्यामुळे त्या परिसरातील निवृत्त मुख्याध्यापिका लिया बार्रेटो यांनी आम्हाला या झाडाची देखभाल करण्यासाठी मार्गदर्शन केले, असे सेलिना यांनी सांगितले. शिक्षिका बार्रेटो यांच्या सांगण्याने आम्ही या झाडाला पाणी घालायला सुरवात केली, अशी माहिती सेलिनाने दिली.

या झाडाला कुणी हात लावलेला किंवा नकळत एखादे फळ तोडलेले सेलिनाला आवडत नाही. बावीस वर्षांपूर्वी आपल्या बहिणीने या झाडाचे रोपटे लावलेले होते. पण जेव्हा सेलिना घरात आली व तिने या झाडाची सेवा करण्यास सुरवात केली, तेव्हाच या झाडाला फळे लागू लागली, असे फ्रांसिस्को सांगतात.

Francisco Barboza and Celina Quadros
भंगारअड्ड्यांसाठी औद्योगिक क्षेत्रात जागा द्या : व्यावसायिकांची मागणी

पपनसचे तोरींग आरोग्यदायी फळ

पपनस झाड देत असलेले ‘तोरींग’ हे फळ आरोग्यदायी आहे. त्या मध्ये वेगवेगळी जीवनसत्वे, मिनरल्स व पॉटेशियम आहेत. तोरींग हे फळ शरिरातील द्रव नियंत्रित करते. रक्तदाब नियंत्रणासाठीही हे फळ उत्तम आहे.

वजन कमी करण्यासाठीही या फळाचा उपयोग होत असतो. कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठीही हे फळ फलदायी आहे. त्यामुळे हे फळ घेण्यासाठी फ्रांसिस्को व सेलिना यांच्या घरासमोर रांगा लागतात.

चतुर्थीत माटोळीसाठी मोठी मागणी

पावसाळा, उन्हाळा असो वा हिवाळा झाडावर तोरींगाचे फळ असतेच असते. सासष्टीतील तसेच उत्तर गोव्यातील लोकही खास इथे हे फळ घ्यायला येतात. गणेश चतुर्थीत तोरींग फळाला माटोळीला बांधण्यासाठी मागणी असते. कधी कधी मागणी एवढी असते, लोकांची नावे प्रतीक्षा यादीत ठेवावी लागतात, असे फ्रांसिस्को अभिमानाने सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com