Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Minister Subhash Shirodkar: कृषी सामग्रीवर 100 टक्के अनुदान हवे

Minister Subhash Shirodkar: आदर्श कृषी सहकारी संस्थेचा वर्धापनदिन सोहळा

दैनिक गोमन्तक

Minister Subhash Shirodkar: कृषी क्षेत्राला संजिवनी द्यायची असेल तर कृषी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीवर शंभर टक्के अनुदान दिले पाहिजे, असे मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. आदर्श कृषी सहकारी संस्थेच्या 31 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बाळ्ळी येथील आदर्श कृषी भवनात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, कृषी संचालक नेविल आफोंसो, नाबार्डचे व्यवस्थापकीय उपसंचालक विश्वास कदम,

आदर्श कृषी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश वेळीप, व्यवस्थापकीय संचालक राणू नाईक गांवकर, उपसंचालक श्रेया वेळीप, संचालक मंडळ व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आदर्श कृषी संस्था गेली ३१ वर्षे समर्थपणे चालू ठेवून शेतीमालाला रास्त भाव मिळवून दिल्याबद्दल शिरोडकर यांनी अध्यक्ष प्रकाश वेळीप, संचालक मंडळ व कर्मचारीवर्गाचे कौतुक केले. भारत देश सुजलाम् सुफलाम् व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

वासुदेव मेंग गावकर म्हणाले की, या संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. काजू, सुपारी, नारळ व इतर उत्पादनांना योग्य भाव मिळवून देते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रशांत वेळीप व श्रेया वेळीप यांनी केले. आभार प्रदर्शन सतीश वेळीप यांनी केले.

मार्केटिंग ही शेतकऱ्यांची समस्या : वेळीप

संस्थापक अध्यक्ष प्रकाश वेळीप म्हणाले की, शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी बेनुर्डे येथे या संस्थेचा पाया रचला. सुरवातीला या संस्थेचे २१ सदस होते.

काही वर्षांतच या संस्थेवर लोकांचा विश्वास वाढला व ही संस्था भरभराटीला आली. आज या संस्थेचे ३२३२१ सभासद आहेत. ३६ शाखा आहेत. ही संस्था शेती बागायती बरोबरच आपल्या पतसंस्थेमध्ये ठेवी स्वीकारते व कर्ज वितरण ही करते.

शिक्षण, आरोग्य, वीमा व इतर क्षेत्रातही आदर्श कृषी सहकारी संस्था काम करते. मार्केटिंग ही शेतकऱ्यांची समस्या आहे व शेतीला योग्य भाव मिळावा हा संस्थेचा हेतू आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT