Goa Zilla Panchayat Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election 2022: पोटनिवडणुकीत 50 टक्क्याहून कमी मतदान; मंगळवारी निकाल

सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली

दैनिक गोमन्तक

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा पंचायतीच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर 21 रोजी जाहीर केला. त्यानुसार आज मतदान पार पडले असून, यात एकुण मतदान 46.66 % मतदान झाले आहे. तर मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी हा निकाल स्पष्ट होणार आहे.

एकुण मतदान 46.66 % पर्यंत

जिल्हा पंचायतीच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडले असुन या निवडणुकांमध्ये 5 वाजेपर्यंत कुठ्ठाळीत 45. 07 % मतदान झाले असुन, रेईश-मागूश जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 43.94 % मतदान झाले आहे. तर दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 50.52 % मतदान झाले आहे.

दुपारी 4.15 वाजेपर्यंत कुठ्ठाळीत 41.29 % मतदान पार

दुपारी 4.15 वाजेपर्यंत कुठ्ठाळीत 41.29 % मतदान झाले असुन, रेईश-मागूश जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 43.93 % मतदान झाले आहे. तर दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 50.51 % मतदान झाले आहे.

दुपारी 3 वाजेपर्यंत कुठ्ठाळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 31.61% मतदान पुर्ण

आज दुपारी 3 वाजेपर्यंत कुठ्ठाळी मतदार संघात 31.61% मतदान झाले आहे. रेईश-मागूश रेईश मागूश जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 25.79 % मतदान झाले आहे. तसेच दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 30.57 % मतदान झाले आहे.

ZP Election: मतदानावेळी हल्ल्याचा प्रयत्न; ओलेन्सिओ सिमॉइस यांचा आरोप

कुठ्ठाळीचे आमदार आतोनियो वास यांच्या पत्नी मर्सियाना वास यांच्या समर्थकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गोवा काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमॉइस यांनी केला आहे.

ते म्हणाले की वास यांच्या समर्थकांनी झेडपी कुठ्ठाळी पोटनिवडणुकीदरम्यान आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. तसेच कुठ्ठाळी येथील अपक्ष उमेदवाराला भाजपने पाठींबा दिला असल्याचा आरोप सिमॉइस यांनी यावेळी केला. त्यामुळे भाजपच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो असे ही ते यावेळी म्हणाले.

रेईश मागूश जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 25.79% मतदान पार

रेईश मागूश जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 25.79% मतदान पार पडले

कुठ्ठाळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 31.61% मतदान पार

कुठ्ठाळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 31.61% मतदान पार पडले आहे.

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 30.57% मतदान पार 

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 30.57% मतदान पार पडले आहे.

कुठ्ठाळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दुपारी 12 पर्यंत 22.81% मतदान पार

कुठ्ठाळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत 22.81% मतदान पार

बेती येथील मतदान केंद्रावर मतदान करताना आमदार केदार नाईक

आमदार केदार नाईक

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 19.23% मतदान पार 

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी सकाळी 8 ते 12 या वेळेत 19.23% मतदान पार पडले

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आमदार उल्हास तुयेकर यांचे मतदान

उल्हास तुयेकर

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आमदार उल्हास तुयेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला..

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी 10 पर्यंत संमिश्र प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर गोव्यातील रेईश मागूश, दक्षिण गोव्यातील दवर्ली आणि कुठ्ठाळी अशा तीन जिल्हा पंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी 10 पर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

दवर्ली: 8.35 %

रेईश मागूश: 10.46 %

कुठ्ठाळी: 8.04 %

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT