Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: 9 वी, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! घ्यावे लागणार तांत्रिक शिक्षणाचे धडे; NEP नुसार परिपत्रक जारी

Vocational Education Goa: धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला लहानपणापासूनच व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षणाचे ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश आहे.

Sameer Panditrao

पणजी: नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेतानाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षण सक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोणताही एक विषय नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात जाऊन शिकावा लागेल.

यासाठी बालरथ उपलब्ध करावा असे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे. त्यांनी परिपत्रकात म्हटले आहे, की कौशल्याधारीत शिक्षण हे मुख्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार तंत्रविज्ञानसंबंधी किमान एक विषय शिकणे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला लहानपणापासूनच व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षणाचे ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्यातील शाळांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक, स्थानिक उद्योग इत्यादींशी संलग्न होत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

तसेच शाळांना असेही निर्देश देण्यात आले आहेत की, विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या काय करत आहेत याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवावा. जेव्हा तपासणी पथक शाळेत येईल त्यावेळी त्यांना ही माहिती द्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT