Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023 : विधवांच्या संरक्षणाबाबत सरकार गंभीर : विश्वजीत राणे

युरी आलेमाव यांनी मांडलेल्या खासगी ठरावावर राणे बोलले

दैनिक गोमन्तक डिजिटल

विधवा महिलांबाबत सरकार नक्कीच गंभीर आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जातील. त्याबाबत पुढील पावसाळी अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेतले जातील, असे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी सभागृहात दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या खासगी ठरावावर राणे बोलले. ठराव मांडताना आलेमाव म्हणाले, राज्यातील विधवा महिलांबाबत होणारे भेदभाव, विधवा अत्याचार आणि अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, विधवा महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. काही जणांना निराधार जीवन जगावे लागते. केवळ नावापुरता नारीशक्तीचा जयजयकार नको, त्यांना सन्मान मिळायला हवा.

याप्रसंगी आमदार दिलायला लोबो यांनीही काही उदाहरणे देत आपले मत मांडले. दरम्यान, समाजात प्रचलित व अप्रचलित पुरातन प्रथांविरुद्ध विधवांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी मत मांडणाऱ्या आमदारांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT