Yuri Alemao: सत्ताधारी आमदारांनीच सरकारला दाखवला आरसा; विरोधी पक्षनेत्यांनी केले कौतूक

आमदार देविया राणे, आ. राजेश फळदेसाई यांनी औद्योगिक वसाहतींमधील गैरकारभाराचा केला पर्दाफाश
Yuri Alemao | Rajesh Phaldesai | Deviya Rane
Yuri Alemao | Rajesh Phaldesai | Deviya Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao: गोव्यातील औद्योगिक वसाहतीतील गैरकारभारावर सत्ताधारी भाजप आमदार डॉ. देविया राणे आणि राजेश फळदेसाई यांनी विधानसभेतील प्रश्नाच्या उत्तरावरील चर्चेत तसेच माझ्या लक्षवेधी सुचनेवर चर्चा करताना सरकारला आरसा दाखवला याचा मला आनंद आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

(Goa Assembly Session)

Yuri Alemao | Rajesh Phaldesai | Deviya Rane
Goa Shipyard: गोवा शिपयार्ड नौदलासाठी बांधणार 7 नवीन युद्धनौका; संरक्षण मंत्रालयासोबत 6,200 कोटींचा करार

आलेमाव म्हणाले, मी गोव्यातील औद्योगिक वसाहतींमधील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखालील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय चौकशी आयोगाची मागणी करणारा खाजगी सदस्य ठराव मांडला होता. परंतू हा ठराव कामकाजात सूचीबद्ध झाला नाही.

आमदार डॉ. देविया राणे यांनी होंडा औद्योगिक वसाहतीमधील विविध औद्योगिक आस्थापनांकडून होत असलेल्या अनियमितता आणि उल्लंघनांचे कथन करून सरकारचा पर्दाफाश केला. कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी खोर्ली औद्योगिक वसाहतीबाबत सरकारच्या भोंगळ कारभारावर निशाणा साधला, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Yuri Alemao | Rajesh Phaldesai | Deviya Rane
Pernem Crime : बलात्कार नव्हे चोरीच्या उद्देशाने तंबूत घुसलो !

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील अवैधता, प्रदूषण आणि अतिक्रमणांचा मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी देखील कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाने केपेंच्या शेतकर्‍यांवर संकट ओढवले असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली असे युरी आलेमाव म्हणाले.

मला मिळालेल्या विधानसभेच्या प्रश्नांच्या उत्तरांवरून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व प्रकारचे उल्लंघन होत असल्याचे उघड होत आहे. मोठी आपत्ती होण्यापूर्वी सरकारने कारवाई करण्याची हीच वेळ आहे, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची दखल घेवून कारवाई करतील आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे सर्व कारखाने व आस्थापने बंद करतील, अशी मी अपेक्षा धरतो असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com