Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : टॅंकर माफियांवर वरदहस्त अभियंत्यांचा; सरकारने माफियांची चौकशी करावी

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची सरकारकडे मागणी

Rajat Sawant

Vishwajit Rane : सत्तरीत टॅंकर माफिया कार्यरत असल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंनी केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांच्याशी बोलणार असून टँकर माफियांची सरकारने चौकशी करावी अशी मागणी विश्‍वजीत राणेंनी केली.

सत्तरी तालुक्यात अनेक गावांमध्ये दररोज किंवा दोन-तीन दिवसांनी टॅंकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. काही भाग डोंगरमाथ्यावर येत असल्याने तेथे जलवाहिनीचे पाणी पोहोचत नाही.

सत्तरीत टॅंकर माफिया कार्यरत आहेत. टॅंकर माफियांचे अभियंत्यांशी संगनमत आहे. सत्तरीत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळेच टॅंकर माफियांचा व्यवसाय अधिक होतो. या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांच्याशी बोलणार आहे. तसेच सरकारने टँकर माफियांची चौकशी करावी अशी मागणी मंत्री विश्‍वजीत राणे यांनी केली आहे.

सत्तरी तालुक्यातील 70 टक्के गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दाबोस पाणी प्रकल्पामधून होतो. येथील जनता ही नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर सत्तरीत अशी काही गावे आहेत त्या ठिकाणी दररोज टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

सध्या सत्तरीत विकासकामांचा झपाटा सुरू आहे. त्यात काही ठिकाणी नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी नवनवीन प्रकल्प येण्याच्या तयारीत आहेत.

सत्तरीत पाण्याच्या टंचाईचे मुख्य कारण म्हणजे नळाची जी जलवाहिनी आहे ती कमी क्षमतेची असून पाणी सोडताना जास्त क्षमतेने सोडत असल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचा प्रकारांत वाढ होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने गळती लागून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT