Crime News
Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News : गोव्यातील माजी आमदाराला जाळून मारण्याची धमकी; दोघांना अटक, एक फरार

कळंगुटमधील पोरबावाडा येथे घडली घटना
Published on

Goa Crime News : म्हापसा कळंगुटमध्ये एका माजी आमदाराला धमकी तसेच शिविगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी आमदाराने पोलिसांत तक्रार दिली असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे तर एक संशयित फरार आहे. फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Crime News
Seafarer In Goa: खलाशी पेन्‍शन योजनेची अर्थसंकल्‍पात तरतूद करा

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कळंगुटमधील पोरबावाडा येथे ही घटना घडली. माजी आमदाराने पोरबावाडा येथील एका रिर्साटच्या बाजूच्या गल्लीतून कार बाहेर रस्त्यावर घेतली.

गाडी बाहेर घेत असताना काही युवकांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्या संबंधित युवकाने आपल्या दोघा मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.

युवकाने माजी आमदाराला अटकाव तसेच गाडीतील त्यांच्या मित्राला शिविगाळ केली आणि जाळून मारण्याची धमकी दिली तसेच कारच्या दरवाजाची मोडतोड केली.

Crime News
एका डॉक्युमेंटरीने आयुष्य बदलले; कामावरून कमी केलेल्या IT कर्मचाऱ्याला अशी मिळाली गोव्यात नवी प्रेरणा

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार माजी आमदाराने कळंगुट पोलिसांत दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांंनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याखाली संशयित सर्वेश दिनकर(21) व मेल्कॉम फर्नांडिस दोघेही राहणार नागवा यांना अटक करण्यात आली आहे. तक जयलॉन नामक संशयित फरार आहे. फरार संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com