Colva Beach
Colva BeachVincent Braganza

Goa Tourism : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर नेमकं चाललंय काय? हा फोटो एकदा बघाच

गोव्यात येणारे किंवा इथे असलेले परप्रांतीय अनेकदा आपली मनमर्जी करताना दिसतात.
Published on

Goa Tourism : गोव्यात येणारे किंवा इथे असलेले परप्रांतीय अनेकदा आपली मनमर्जी करताना दिसतात. असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. उत्तर गोव्यातील कोलवा समुद्रकिनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे.

Colva Beach
Goa Shigmotsav 2023: रात्री 10 पर्यंत शिगमा अशक्‍यच!

गोव्यात मोठ्या प्रमाणावर मासेमारी आणि मासेमारीशी संबंधित व्यवसाय चालतात. समुद्रातून पकडून आणलेले मासे वाळवण्याचीही एक पद्धत आहे. यावेळी उरलेले माशांचे अवयव, आतडे हे कामगार राजरोसपणे समुद्राच्या पाण्यात सोडतात.

असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की कामगार उरलेले खराब माशांचे तुकडे समुद्राच्या पाण्यात टाकत आहेत; ज्यावर कुत्रे आणि कावळे चांगलाच ताव मारताना दिसत आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर खुल्या पद्धतीने सुरू असलेल्या या गोष्टींमुळे इथे येणाऱ्या पर्यटकांपुढे चुकीचा आदर्श ठेवला जात आहे. गोव्यात येणारे पर्यटक हे इथे आनंद लुटण्यासाठी येत असतात. पण या अशा प्रकारांमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होण्याचाही धोका नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com