Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : मोदी सरकारमुळे राज्यांचा चौफेर विकास : विश्‍‍वजीत राणे

पुढच्या वर्षापासून सत्तरीत गजांतलक्ष्मी व म्हादई उत्सव करणार साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्रात गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारमुळे राज्यांचा चौफेर विकास झाला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यामध्ये आरोग्य, रस्ते, पूल, विमानतळ आदी सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांतून भरघोस मतांची आघाडी देण्यासाठी सरपंच, पंच व कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

भाजपने आज रविवारी आयोजित केलेल्या पर्ये मतदारसंघ लाभार्थी मेळाव्यात राणे बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावाडे, पर्येच्या आमदार डॉ दिव्या राणे, भाजप संघटक विनोद शिंदे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, पर्ये सरपंच रती गावकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, केरी सरपंच दीक्षा गावस, उपसरपंच उपस्थित होते.

सत्तरी तालुक्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. त्या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी पुढच्या वर्षापासून सत्तरी तालुक्यात गजांतलक्ष्मी व म्हादई उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर करून या विषयीची सविस्तर माहिती येणाऱ्या काळात दिली जाईल असे विश्‍‍वजीत राणे म्‍हणाले. यावेळी पर्ये मतदारसंघातील सुमारे २७ अटल आश्रय लाभार्थींना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. मोर्ले सरपंच अमित शिरोडकर यांनी स्वागत तर नूतन पार्सेकर यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याला पर्ये मतदारसंघातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

केंद्रात पुन्‍हा एकदा येणार भाजप सरकार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाची प्रशंसा आज जगभर केली जात आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या भाजपचे दोन्ही सभागृहात जास्त खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य व पंचायत सदस्य मोठ्या संख्‍येने आहेत. त्यामुळेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे सरकार पुन्‍हा सत्तेवर येईल असा आशावाद विश्‍‍वजीत राणे यांनी व्यक्त केला.

गेल्‍या नऊ वर्षांत आमच्‍या गोव्‍यातही बरेच मोठे प्रकल्प उभे राहिले. त्याचे सर्व श्रेय मोदी सरकारला दिले पाहिजे. त्यामुळे सत्तरीतील वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघांतील भाजप कार्यकर्त्यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आतापासून कामाला लागावे.

विश्‍‍वजीत राणे, आरोग्‍यमंत्री

भाजप सरकारच्‍या सर्व सुविधा सामन्यातील सामान्य माणसापर्यंत पोचल्या आहेत. त्यामुळे त्‍याचे राहणीमान उंचावले आहे. येणाऱ्या काळात विकासकामांबरोबरच योजनांचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

डॉ. दिव्या राणे, पर्येच्या आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT