Monsoon Diet: कसा असावा पावसाळ्यातील आहार? वाचा 'Ayurveda' काय सागतं

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात काय खावे, काय नाही आणि कसे खावे हे सांगितलेले आहे.
Monsoon Diet
Monsoon DietDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Diet According To Ayurveda: आयुर्वेदाचे नियम हजारो वर्षांपासून त्यांचे महत्त्व टिकवून आहेत. कारण त्यात औषधांपेक्षा निरोगी जीवनशैलीला अधिक महत्त्व दिले आहे. 

योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास व्यक्ती नेहमी निरोगी आणि रोगमुक्त राहू शकतो असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. म्हणूनच आयुर्वेदात प्रत्येक ऋतूनुसार जीवनशैली आणि आहाराचे काही नियम दिले आहेत.

पावसाळा सुरू झाला असून आयुर्वेदानुसार पावसाळ्यात तुमचा आहार कसा असावा हे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार आहार घेतल्यास निरोगी राहून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

  • या कडधान्यांचा आहारात करावा समावेश

पावसाळ्यात तृणधान्यांमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे शरीराला शेकडो रोगांपासून दूर ठेवतात. त्यामुळे पावसाळ्यात गहू, तांदूळ, ज्वारी, क्विनोआ, ओट्स, मका इत्यादींचे सेवन करावे. या धान्यांचा वापर करून तुम्ही रोटी, पराठा, पोहे, डोसा, उपमा, इडली, खिचडी, लापशी यासारखे अनेक पदार्थ बनवू शकता.

  • ही फळे आणि भाज्यांचे करावे सेवन

आयुर्वेदानुसार तुम्ही नेहमी फक्त हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. जरी हंगामाबाहेरच्या गोष्टी बाजारात उपलब्ध असल्या तरी त्यांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर नाही. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

त्यामुळे तुमच्या आहारात विविध रंगीबेरंगी फळे (Fruits) आणि भाज्यांचा समावेश करा. पावसाळ्यात भोपळा, भेंडी, कांदा, लसूण, टोमॅटो, आले, शिमला मिरची, वांगी इत्यादींचे सेवन करावे. फळांमध्ये तुम्ही सफरचंद, डाळिंब, चेरी, पीच, अननस, किवी, बेरी आणि इतर हंगामी फळांचे सेवन करू शकता .

Monsoon Diet
Monsoon Skin Care: पावसाळ्यातही चेहऱ्यावर ग्लो हवा आहे? तर आतापासून 'या' 3 गोष्टींचा वापर सुरू करा
  • पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करावे

मसाले जेवणाची चव तर वाढवतातच, पण योग्य मसाल्यांचा वापर केल्यास तुमची प्रतिकारशक्तीही वाढवू शकता. म्हणूनच तुमच्या जेवणात हिंग, जिरे, धणे, काळी मिरी, विलायची, दालचिनी, तमालपत्र, मेथी, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी वापरु शकता. तसेच घरगुती कोथिंबीर, घरगुती पुदिन्याची पाने, लसूण, आले, कांदा, लिंबू इत्यादी काही औषधी वनस्पतींचे सेवन करावे.

  • पावसाळ्यात आहार आणि लाइफस्टाइलचे हे नियम पाळावे

  1. पावसाळ्यात ताक, दही, गाईचे दूध आणि देशी तूपचे सेवन करावे.

  2. दररोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

  3. योगासन, प्राणायाम आणि ध्यानासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ काढावा.

  4. घरात अगरबत्ती, कडुलिंबाची पाने, कापुर जाळावा.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे

  1. पावसाळ्यात पालेभाज्यांचे स्वन टाळावे. कारण पावसाळ्यात त्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटक जास्त असतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. 

  2. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करावे. 

  3. दुपारच्या जेवणात गोड, खारट, कडू, आंबट, तिखट, तुरट इत्यादींचा समावेश करावा.

  4. रात्री गोड आणि आंबट पदार्थांचे सेवन टाळावे

  5. रात्रीचे जेवण हलके असावे आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळद किंवा 1 चमचा देशी तूप एका ग्लास दुधात टाकून प्यावे. 

  6. पावसाळ्यात गाईचे दूध सेवन करणे आरोग्यदायी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com