Illegal Hill Cutting in Morjim Dainik Gomantak
गोवा

मोरजीतील डोंगर कापणी बंद करण्याचे आदेश

संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे ‘टीसीपी’चे निर्देश; विश्वजीत राणे अॅक्शन मोडवर

दैनिक गोमन्तक

पणजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील बेकायदा डोंगर कापणी प्रकरणी नगरनियोजन विश्‍वजीत राणे यांनी गंभीर दखल घेऊन डोंगर कापणी त्वरित बंद करावी आणि संबंधित कंपनी आणि फार्म मालकावर गुन्हा नोंद करावा असा आदेश मंत्री विश्वजीत राणे यांनी नगरनियोजन खात्याला आज दिला आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर दिल्लीच्या उद्योजकांनी विकत घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फार्म हाउसच्या नावाखाली बंगले उभारण्याचे सत्र अवलंबले आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात काँक्रिटचे रस्ते स्थानिक पंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम खाते यांची परवानगी न घेता उभारण्याचे काम सुरू आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर नगरनियोजन खात्याने ही कारवाई केली आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात डोंगर कापून बेकायदा बांधकाम चालू असल्याची लेखी तक्रार मयूर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीकडे केली आहे. या बांधकामावर आणि डोंगर कापणीवर त्वरित कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले होते.

निसर्गाचा ऱ्हास करत मोठ्या प्रमाणात दिल्लीतील अनेक हॉटेल मालक उद्योजक, चित्रपट नगरीतील व्यावसायिक, क्रिकेटपटू यांनी डोंगर माळरानावरील जमिनी विकत घेतलेले आहेत. या जमिनी विकत घेऊन फार्महाउस नावाखाली मोठे बंगले बेकायदा बांधलेले आहेत, असा आरोपही केला जात होता. अखेर आज मंत्री विश्वजीत राणेंनी यात लक्ष घालत संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT