मालवाहू ट्रकची रुग्णवाहिकेला धडक बसल्याने अपघात

ट्रक रिव्हर्स घेताना डिचोली-साखळी रस्त्यावर अपघात; वाहतूक काहीकाळ घोळंबली
Truck Hits Ambulance
Truck Hits AmbulanceDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : डांबरमिश्रित खडीवाहू ट्रकने सेसा (वेदांता) कंपनीच्या रुग्णवाहिकेला धडक दिल्याने अपघात झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी कारापूर-तिस्क परिसरात घडली आहे. सुदैवाने या अपघातात रुग्णवाहिकेची काही प्रमाणात नुकसान वगळता अन्य कोणताही अनर्थ घडला नाही.

Truck Hits Ambulance
पेडणे शहरात वाहतुकीची कोंडी

या अपघातामुळे साखळी-डिचोली रस्त्यावरील वाहतुकीचा काहीवेळ खोळंबा झाला. अपघात घडला त्याठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम चालू होते. अपघातामुळे हे कामही काहीवेळ खोळंबले होते.
जीए-04-टी-4067 या क्रमांकाची सेसा (वेदांता) कंपनीची रुग्णवाहिका साखळीच्या दिशेने जात होती. कारापूर येथील शर्वराज फार्मजवळ पोचताच त्याठिकाणी मागे घेत असता जीए-04-टी-1828 डांबरमिश्रित खडीवाहू ट्रकची रुग्णवाहिकेला मागच्या बाजूने धडक बसली.

Truck Hits Ambulance
मडगाव पालिकेचा नियोजनशून्य कारभार; सुस्थितीत असलेल्या गाड्या वापराविना गॅरेजमध्ये

अपघातग्रस्त ट्रक त्याठिकाणी चालू असलेल्या हॉटमिक्स डांबरीकरणासाठी खनिजमिश्रित डांबर घेऊन आला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. हे प्रकरण नंतर आपापसात सामोपचाराने मिटवण्यात आले. मात्र अपघातामुळे साखळी-डिचोली मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा काहीवेळ खोळंबा झाला. अपघातात वाहनांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Samagra Shiksha Walk In Interview
Reis Magos Gram Sabha case
Mandovi River Pollution Report
Goa High Court Shivaji Maharaj statue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com