Ashadhi Ekadashi Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Vishwajit Rane: आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरवात होते. हा काळ श्रद्धा, साधना आणि आत्मचिंतनाचा आहे. श्री पांडुरंगाच्‍या भक्तांसाठी या दिवसाचे खास महत्त्व आहे.

Sameer Panditrao

वाळपई: आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी साखळी येथील विठ्ठलापुरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दुग्धाभिषेक करून पूजा केली. या पवित्र दिवशी त्यांनी गोमंतकीय जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच राज्यात सर्वत्र सुख, समृद्धी आणि सद्‌भावना नांदावी यासाठी श्री विठ्ठलचरणी प्रार्थना केली.

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरवात होते. हा काळ श्रद्धा, साधना आणि आत्मचिंतनाचा आहे. श्री पांडुरंगाच्‍या भक्तांसाठी या दिवसाचे खास महत्त्व आहे. भक्ती, समर्पण आणि साधेपणा याचे प्रतीक असलेल्या श्री विठ्ठलाच्या चरणी मंत्री राणे यांनी आपला मनोदय व्यक्त केला.

यावेळी त्यांनी आपले आई-वडील, कुटुंबीय, सत्तरीवासीय आणि संपूर्ण गोमंतकीय जनतेसाठी आरोग्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली. पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरात विठ्ठलापुरात भाविकांचा महासागर लोटला होता. सकाळपासून अनेक भक्तांनी पायी वारी करत श्रींचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनी त्‍यांचे स्‍वागत केले.

विश्‍‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

श्री विठ्ठल-रखुमाईच्‍या कृपेने सर्व गोमंतकीय बंधू-भगिनी निरोगी, सुरक्षित आणि समाधानी राहू देत. माझ्या सर्व गोमंतकीय बांधवांना उत्तम आरोग्य लाभावे आणि समाजात एकोपा, बंधुभाव नांदावा हीच श्री विठ्ठलचरणी प्रार्थना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा काही केल्या सुटेना, गृहमंत्री शहांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

Goa Crime: मुंगूल गँगवॉर प्रकरण, वॉल्‍टरचे दक्षिणेतील वर्चस्‍व भेदण्‍यासाठी केपे-फोंड्यातील 4 गँग एकवटल्या

Rashi Bhavishya 14 August 2025: आरोग्य सुधारेल, कामात वेग आणि उत्साह राहील; आर्थिक लाभ होण्याची शक्यता

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT