Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Pandharpur Wari: ऊन, वारा याची पर्वा न करता, कटेवरी हात ठेवूनी विटेवरी उभा असलेल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर गाठले आहे.
Goa to Pandharpur Wari | Ashadhi Ekadashi
Goa to Pandharpur Wari | Ashadhi EkadashiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पाऊस, ऊन, वारा याची पर्वा न करता, कटेवरी हात ठेवूनी विटेवरी उभा असलेल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर गाठले आहे. गोव्यातूनही सुमारे ४१ दिंड्या गेल्या असून जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

अशी त्यांची भावना आहे. मुरगाव वारकरी संस्था गोवा आणि श्री भूमिका प्रसन्न, संत तुकाराम वारकरी मंडळ पर्ये, सत्तरी यांच्या दिंडीतून गेलेल्या काही वारकऱ्यांनी वारीचा आणि विठुरायाच्या सावळ्या रूपांच्या दर्शनाचे कथन केलेले अनुभव....

अभिषेक गावस

माझे नातेवाईक, कटुंबिय यापूर्वी वारी करायचे त्यांचे अनुभव ऐकून मला वारी करण्याची इच्छा झाली. आम्ही १४ दिवस पायी चालत पंढरीच्या दिशेने जात होतो. परंतु या वारीत जो मी जीवनाचा अनुभव घेतला तो माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मला कधीच लाभला नव्हता. या वारीत ऊन, पाऊस, वारा, निसर्गाचे रूप अनुभवले. नवीन माणसे जोडली, वारकरी संप्रदायाच्या अनेकांकडून खूप काही शिकता आले. ही अनुभवाची शिदोरी घेऊन मी माझे भावी आयुष्य व्यतीत करणार आहे.

कृष्णा माईणकर

विठुरायाच्या ओढीने पायी पंढरीच्या दिशेने जाताना विठुरायाची ओढ निश्‍चित असतेच. त्यासोबतच, वारीत सहभागी झाल्याने आपण जीवन कसे जगावे हे कळून येते. आम्ही वारीतून जाताना ज्येष्ठ नागरिक देखील पायाला मस्तक टेकवून नमस्कार करतात. एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. जीवनाचा खरा बोध येथे होतो. आपल्या मनाला शांती मिळते. हे वारीतील पंधरा दिवस कसे जातात तेच कळत नाही. अतिशय दिव्य अनुभूती मिळविण्यासाठी जीवनात एकदा तरी पायी वारी करणे गरजेचे आहे.

लक्ष्मी माजिक

पंढरपूरला पायी चालत जाण्याचा अनुभव हा अतिशय स्मरणीय आणि सुखद अनुभव असतो. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असला कोणताच भेदभाव वारीत नसतो. सर्व त्या विठुरायाची लेकरे असतात जी त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेली असतात. वारीचा अनुभव हा शब्दात सांगताच येत नाही.

Goa to Pandharpur Wari | Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

शांतावती मयेकर

शेकडो किलोमीटर पायी चालत, विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूर गाठणे, चंद्रभागा तिरावर जाणे, विठुरायाचे दर्शन घेण्यासारखे दुसरे आयुष्यात सुख नाही. भक्तांची वाट पाहत उभा असलेल्या विठुरायाचे दर्शन घेतल्याने पायी चालत गेलेल्या कष्टाचे समाधान मिळते. वारी आपल्याला समृद्ध करत असते.

Goa to Pandharpur Wari | Ashadhi Ekadashi
Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

वारी

विठू माऊलीची वारी,

जन जन गोळा करी.

देहभान विसरून,

विठूची आठवण करून.

निघाली वारकऱ्यांची वारी,

भजन, अभंग गातील सारी.

नको मला कुणाचा आसरा,

विठू माऊली आहे माझा खरा.

प्रेमेभावे जो जातील,

मनोमनी विठू दिसतील.

तुळस माथ्यावरी वारकरी,

वारी जाते हो पंढरपुरी.

जन्म-मरणाचा फेरा चुकवी,

क्षणात हा देव विठू पंढरी.

घेतो भक्तजनांची परीक्षा,

हरी बोलावितो आषाढी एकादशीला.

- दुर्वा दु. वारीक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com