Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: 'मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमागे मी धावत नाही'! राणेंचे स्पष्टीकरण; मोदींचे नेतृत्व बघून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा खुलासा

Vishwajit Rane Interview: त्या दिवशी ओपीडी बंद होती, त्यामुळे त्या वृद्ध महिलेला आपत्कालिन विभागाशिवाय दुसरीकडे जाण्याचा पर्याय नव्हता, असे राणे यांनी गोमेकॉतील घटनेवर स्पष्टीकरण दिले.

Sameer Panditrao

पणजी: वास्तवाचे भान ठेऊन नेत्याने नेहमी जमिनीवर राहून गरिबांची सेवा करायला हवी. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्ची मागे मी धावत नाही तसेच, प्रमोद सावंत यांच्याशी कोणताही वाद नाही, असे मत राज्याचे आरोग्य आणि वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले.

एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि कामांकडे पाहून मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्य आणि केंद्रात एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. भाजप आणि काँग्रेसमध्ये शिस्तीचा मोठा फरक आहे,’ असे राणे म्हणाले.

‘गोमेकॉ’त घडलेला प्रकार कदाचित योग्य नव्हता पण ज्येष्ठ नागरिकांना वेळेत उपचार मिळायला हवेत असा माझा आग्रह असतो.

त्या दिवशी ओपीडी बंद होती, त्यामुळे त्या वृद्ध महिलेला आपत्कालिन विभागाशिवाय दुसरीकडे जाण्याचा पर्याय नव्हता, असे राणे यांनी गोमेकॉतील घटनेवर स्पष्टीकरण दिले.

गोव्यात कसालाही भाषावाद नाही. येथे हिंदी, कन्नड कोणतीही भाषा बोलू शकता, असे सांगत राणे यांनी राज्यातील भाषेतील तरलता अधोरेखित केली. त्यांनी महाराष्ट्रातील भाषावादावर बोलण्यास नकार दिला.

‘पर्यटकांचा गोव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार्टीच्या पलिकडे बदलत आहे. येथील हिंटरलँड, धार्मिक पर्यटन पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे राणे म्हणाले. राज्यातील वाहतूक समस्येवर बोलताना मुख्यमंत्री सावंत कार्यक्षम असून ते लवकरच त्यावर तोडगा काढतील असे उत्तर दिले.

वडील प्रतापसिंह राणे यांच्याबाबत बोलताना त्यांनी त्यांचा वारसा खूप मोठा असल्याचे सांगितले. प्रतापसिंह राणे यांनी २१ वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. दयानंद बांदोडकरांनी घरी येऊन त्यांना तुमच्या सारख्या उच्च शिक्षित लोकांची राजकारणात गरज आहे, असं सांगितल्याची आठवण विश्वाजीत राणे यांनी सांगितली.

राज्यातील लोक माझ्याकडे देखील एका अपेक्षेने पाहतात. प्रतापसिंह यांचा मुलगा म्हणून लोक मला निवडून देत नाहीत. एखादी टर्म तसे होऊ शकते पण, पाचवेळा तसे होणार नाही. लोक तुमचे कामच पाहतात, असे राणे म्हणाले. विश्वजीत राणे यांनी बॅटमिंटनमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केल्याचेही मुलाखतीत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT