Vishwajit Rane: नोकरीसाठी कधीही पैसे घेतले नाहीत! Viral Video वरती राणेंचे स्पष्टीकरण; पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन

Vishwajit Rane Viral Video: विश्‍वजीत राणेंच्या खात्यात नोकऱ्या देण्यासाठी पैसे घेतले जातात, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला व या वादाला सुरवात झाली आहे.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: काही महिन्यांपूर्वी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण गोव्यात गाजले. कित्येकांची चौकशी झाली. नंतर हे प्रकरण थंड झाले असे वाटत असतानाच आता आरोग्य, वन, नगर विकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी नोकरीसाठी पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या संदर्भात मडगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी कधीही नोकरीसाठी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. आरोप करणाऱ्यांकडे पुरावा असल्यास त्यांनी जरूर पोलिसांत तक्रार करावी, असे त्यांनी ठणकावले.

मी किंवा आपले वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. आम्ही कधीही नोकरीसाठी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत, असेही राणे यांनी सांगितले. आपल्या खात्यातील नोकऱ्या केवळ गुणवत्ता व क्षमतेनुसार दिल्या जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vishwajit Rane
US Job Fraud: अन्न-पाणी नाही, मेक्‍सिकोचे जंगल, अमेरिकन सैनिकांची गस्‍त; गोव्यातून परदेशात नोकरीसाठी गेलेल्यांची कशी झाली फसवणूक?

विश्‍वजीत राणेंच्या खात्यात नोकऱ्या देण्यासाठी पैसे घेतले जातात, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला व या वादाला सुरवात झाली आहे. या प्रकरणात आमच्याकडे कागदपत्रे व आॅडिओ रिकोर्डिंग असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात येते.

Vishwajit Rane
Deviya Rane: पहलगाम दहशतवादी हल्ला! मुख्यमंत्री सावंत यांच्यानंतर आमदार देविया राणे यांचाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

आरोग्य, नगर विकास, नगर नियोजन या खात्यातून उमेदवारांना पत्रे पाठवलीत, त्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. मात्र, ही पत्रे मंत्र्यांनी पाहिल्याचा उल्लेख आहे, असे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com