Vishal Golatkar Murder Case Dainik Gomantak
गोवा

Vishal Golatkar Murder Case: गँगवारच्या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग!

प्रशिक्षणार्थी पोलिस अमेय वळईकर गजाआड

दैनिक गोमन्तक

Vishal Golatkar Murder Case: मेरशी येथील हिस्ट्रीशिटर विशाल गोलतकर याच्या पूर्वनियोजित खूनप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी आज वाळपई येथे पोलिस प्रशिक्षण घेत असलेला पाचवा संशयित अमेय वळवईकर (वय २५) याला अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांचा समावेश असणारे गेल्या दहा दिवसांमधील हे दुसरे प्रकरण आहे.

त्यामुळे या गँगवारमध्ये पोलिसही सहभागी वा पाठिंबा देऊ लागले असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या खूनप्रकरणी अटक झालेल्या संशयितांची संख्या पाच झाली असून एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. बाल गुन्हेगाराला ‘अपना घर’मध्ये पाठविण्यात आले आहे.

हल्लीच गेल्या मार्चमध्ये नव्याने पोलिस खात्यात भरती झालेला व वाळपई प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेला अमेय वळवईकर हा संशयित कुंडईकर याचा नातेवाईक आहे. ज्यावेळी विशाल गोलतकर याच्यावर हल्ला झाला तेव्हा तोसुद्धा त्यांच्यासोबत होता अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने कालपासूनच त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती.

रविवारी प्रशिक्षण केंद्रात सुट्टी असल्याने तो शनिवारी संध्याकाळी घरी आला होता. विशाल याचा खून करण्याच्या योजनेत तोसुद्धा सामील झाला होता. पोलिसांनी खून व कटकारस्थानाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे अजून जप्त करण्यात आलेली नाहीत.

पाच संशयितांना न्यायालयात उभे केले असता पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली होती. या प्रकरणात आणखी काही संशयित असण्याची शक्यता असून चिंबल येथे टॅक्सीचालक जयेश चोडणकर यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल प्रीतेश अडकोणकर याला अटक केली आहे.

पाच संशयितांना ७ दिवसांची कोठडी

काल व आज अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. विशाल गोलतकर याच्या मृतदेहाची डॉक्टरांनी शवचिकित्सा केली असून अहवाल अजून दिलेला नाही.

काल २४ तासांत पोलिसांनी साई ऊर्फ कोब्रा कुंडईकर, तुषार कुंडईकर, ओमकार च्यारी, गौरेश गावस या चौघांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती व प्रशिक्षणार्थी पोलिस अमेय वळवईकर याला आज अटक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT