Kerya Khandepar Highway | Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Kerya Khandepar: केरये-खांडेपार येथील महामार्ग धोकादायक! अनेक अपघातांची नोंद; खासदार विरियातोंकडून पाहणी

Kerya Khandepar Highway: केरये-खांडेपार येथील तिठ्यावरील धोकादायक महामार्गाची दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी पाहणी केली. या ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्‍वासन त्यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Kerya Khandepar Highway Near Curti

पाळी: केरये-खांडेपार येथील तिठ्यावरील धोकादायक महामार्गाची दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी पाहणी केली. या ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, काँग्रेसचे इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. येथील महामार्गाचे बांधकाम करताना स्थानिकांच्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. या ठिकाणी चर्च तसेच सरकारी प्राथमिक शाळा आणि सुमारे चाळीस घरे आहेत. लोकांना रस्ता पार करताना धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागते. अनेक अपघातही झाले आहेत. हा धोका दूर करण्यासाठी एकतरी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

आपण याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते तसेच महामार्ग प्राधिकरणाकडे हा प्रश्‍न मांडून यावर तोडगा काढला जाईल, असे विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

आराखडा सदोष...

कुर्टी ते खांडेपारपर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरण रस्त्याचा आराखडा सदोष आहे. महामार्ग ही काळाची गरज असली तरी हे काम करताना स्थानिकांना विश्‍वासात घ्यायला हवे. कंत्राटदार आपले काम करतो आणि निधून जातो, पण नियोजनाअभावी केलेल्या कामाचा फटका स्थानिकांना बसतो, असे यावेळी राजेश वेरेकर यांनी सांगितले.

स्थानिकांची सुरक्षा महत्त्वाची...

वाढत्या वाहनांमुळे रस्त्यांचे रुंदीकरण हे महत्त्वाचे ठरले आहे. पण हे रुंदीकरण करताना रस्त्याशी संबंधित ग्रामस्थांच्या समस्याही लक्षात घ्यायला हव्यात. चौपदरी महामार्ग हवाच आहे, पण लोकांना त्यामुळे समस्यांना सामोरे जाता कामा नये, याकडे लक्ष द्यायला हवे, पण इथे तसे काही झाल्याचे दिसत नाही, असे विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iker Guarrotxena: 'गोव्याला माझे घर मानतो'! स्पॅनिश ग्वॉर्रोचेनाचे प्रतिपादन; मोसमअखेरपर्यंत FC Goa संघात

Baga Crime: सेंट क्रॉस कपेलाच्या मूर्तींची केली मोडतोड, नदीत दिल्या फेकून; मुंबईच्या एकाला अटक

Education Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींचे लोक असतात 'पुस्तकी किडे'; अभ्यासात नेहमीच मिळवतात मोठे यश

Leopard Attack: शिगावात रात्री बिबट्याची दहशत, कुत्र्यांचा पाडला फडशा; वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी

Goa Education: कितीही विषय अनुतीर्ण, विद्यार्थ्यांना 5 व्या सत्रात मिळणार प्रवेश; गोवा विद्यापीठाचे परिपत्रक

SCROLL FOR NEXT