Viriato Fernandes X
गोवा

Cash For Job Scam: नोकरी घाेटाळ्‍याची दोरी 'वेगळ्यांच्याच' हातात! सीबीआय चौकशीची खासदार विरियातोंची मागणी

Capt. Viriato Fernandes: या घाेटाळ्याची व्‍याप्‍ती फार मोठी असल्यामुळे या घाेटाळ्‍याची सीबीआयद्वारे चौकशी करण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Capt. Viriato Fernandes About Cash For Job Scam

मडगाव: सध्‍या गोव्‍यात सरकारी नोकरीच्‍या बदल्‍यात पैशांची लाच हा घाेटाळा गाजत आहे. या प्रकरणात तीन महिलांना अटक केली असली, तरी या तिन्‍ही महिला फक्‍त कटपुतळ्‍या असून प्रत्‍यक्षात या घाेटाळ्‍याची दोरी वेगळ्यांच्याच हातात आहे. या घाेटाळ्याची व्‍याप्‍ती फार मोठी असल्यामुळे या घाेटाळ्‍याची सीबीआयद्वारे चौकशी करण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अटक केलेल्‍या तिन्‍ही महिला उत्तर गोव्‍यातील आहेत आणि गोव्‍याचे मुख्‍यमंत्रीही उत्तर गोव्‍याचे आहेत. हा फक्‍त योगायोग की आणखी काही हे तपासण्‍याची गरज आहे. त्‍यासाठीच ही चौकशी सीबीआयद्वारे करण्‍याची गरज आहे. तसे झाले तर या घोटाळ्यातील खरा सुत्रधार कोण हे लोकांसमोर येईल अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ती ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या फेसबुक, यू-ट्यूब आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

गोवा सरकारचे एकही धोरण स्‍थानिकांचे हित लक्षात घेऊन आखलेले नाही. केंद्रीय भाजप नेत्‍यांशी जवळीक असलेल्‍या धनाढ्यांना फायदेशीर जे काय होणार तशीच गोवा सरकारने धोरणे आखली जात आहेत. केंद्र सरकारला गोवेकरांपेक्षा अदानी आणि जिंदाल यांच्‍या फायद्याचे पडून गेले आहे. केंद्राला गोवा हे कोळशाचे आगर करायचे आहे. त्‍यामुळेच गोव्‍यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्‍यास केंद्र सरकारला किंवा राज्‍य सरकारला नको आहे. केंद्राने मुरगाव बंदर कोळसा उद्योजकांना आंदण देऊन ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पणजीत पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री खोळंबले

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT