Viresh Borkar Revolutionary Goans
Viresh Borkar Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : रिव्हॉल्युशनरी गोवन्स सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवणार

दैनिक गोमन्तक

पणजी : आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर सतत प्रयत्नशील असतात. आता विधानसभा अधिवेशनात गोमंतकीयांचे प्रश्‍न हिरिरीने मांडू. आमदार या नात्‍याने राज्‍याचे आणि पर्यायाने सांतआंद्रे मतदारसंघातील समस्या, प्रश्‍न आणि अडचणी सोडवणे माझे कर्तव्‍य आहे, असे म्हणत वीरेश बोरकर यांनी तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी गोमंतकीयांनी 18 जूनपर्यंत आपले प्रश्‍न रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाकडे पोहोचवावेत, असे आवाहन रेव्होल्युशनरी गोवन्‍स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्‍यात गुन्‍हेगारी वाढत आहे. दररोज काही ना काही गुन्‍हे घडत आहेत. पोलिसांचे आणि गृहखात्‍याचे यावर नियंत्रण नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

केवळ बैठका घेऊन काही उपयोग होणार नाही. यावर कायमस्‍वरुपी तोडगा काढण्याची आवश्‍यकता असल्‍याचे आमदार बोरकर म्‍हणाले. गोमंतकीयांना विश्‍वासात न घेता विकास प्रकल्‍प रेटले जात आहेत. याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे, असे आमदार बोरकर म्हणाले. दरम्‍यान, गोमंतकीयांनी आपले प्रश्‍न mla.santacruz.gds@gov.in या ई-मेल पत्त्यावर 18 जूनपूर्वी पाठवावेत, असे आवाहन आमदार बोरकर यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT