Madgao District Hospital Viral Video Dainik Gomantak
गोवा

South Goa Hospital: "ये रातें, ये मौसम, नदी का किनारा" रुग्णालयातून गाण्याचा आवाज; Viral Video वर वैद्यकीय अधीक्षकांचं स्पष्टीकरण

Margao District Hospital Viral Video: मडगावमधील जिल्हा रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चौथ्या मजल्यावरील एका खोलीतून जोरजोरात हिंदी गाणी गातानाचा आवाज येत होता.

Akshata Chhatre

Margao South Goa Hospital Viral Video

मडगाव: दक्षिण गोव्यातील जिल्हा हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संगीत आणि गाण्याच्या आवाजाचा इतर रुग्णांना त्रास होणार नाही, अशी तंबीवजा सूचनाच डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

मडगावमधील जिल्हा रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ कोणी शूट केला हे समजू शकलेले नाही. मात्र, चौथ्या मजल्यावरील एका खोलीतून जोरजोरात हिंदी गाणी गातानाचा आवाज येत होता.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी याबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांना विचारले असता ते म्हणाले, बाहेरच्या राज्यातून आलेले जवळपास 12 डॉक्टर सध्या गोव्यातील सरकारी रुग्णालयात सेवा देत आहेत. या डॉक्टरांची बाहेर रहायची व्यवस्था होईपर्यंत त्यांना रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर एक खोली देण्यात आली आहे. याच खोलीतून गाण्याचा आवाज येत होता.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. राजेंद्र बोरकर यांनी चौकशी केली. यात खोलीत राहणाऱ्या डॉक्टरांनी जोरजोरात गाणी म्हटल्याचे मान्य केले. "आम्ही जुनी गाणी ऐकत होतो, आणि ऐकता ऐकता आम्ही पण गाणं गात होतो" असं त्या निवासी डॉक्टरांनी बोरकर यांना सांगितले. यानंतर बोरकरांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हॉस्पिटलमध्ये रुग्ण असतात त्यामुळे डॉक्टरांनी कमी आवाजात गाणी ऐकावीत. डॉक्टरांच्या गाणी ऐकणावर अथवा गाण्यावर प्रशासनाचा आक्षेप नाही . मुद्दा आवाजाचा आहे, असे बोरकरांनी आवर्जून स्पष्ट केले.

निवासी डॉक्टर उपक्रमाअंतर्गत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून काही डॉक्टरांची नियुक्ती केली जात आहे, याअंतर्गत सध्या मडगावच्या जिल्हा रुग्णालयात सुमारे 12 डॉक्टर काम करत आहेत आणि हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT