Goa Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction Morjim: सीआरझेड’चे उल्लंघन करून उभारले बांधकाम

Goa: विठ्ठलदासवाडा किनारी भागात भरती रेषेपासून केवळ 15 मीटर अंतरावर नॉर्बर्ट सेबेत्यांव यांच्या मालकीच्या जमिनीत तीनमजली इमारतीचे काम जोरात सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Construction: विठ्ठलदासवाडा-मोरजी येथे किनारी भागात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून इमारतीचे बांधकाम केल्याची तक्रार शिवनाथ शेटगावकर यांनी पंचायतीला दिल्यानंतर शनिवारी सरपंच सुरेखा शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी करून पंचनामा करण्यात आला.

विठ्ठलदासवाडा किनारी भागात भरती रेषेपासून केवळ 15 मीटर अंतरावर नॉर्बर्ट सेबेत्यांव यांच्या मालकीच्या जमिनीत तीनमजली इमारतीचे काम जोरात सुरू आहे.

त्यासंदर्भात मळेकरवाडा येथील शिवनाथ शेटगावकर यांनी सीआरझेड विभागासह मोरजी पंचायतीकडेही लेखी तक्रार देऊन या बांधकामावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार काल सरपंच सुरेखा शेटगावकर, पंच सदस्यांसह पंचनामा केला.

ज्यावेळी सरपंच, पंचायत सदस्य, सचिव पाहणी करत होते, त्यावेळी बाजूलाच बांधकामे सुरू होती. या बांधकामांचा पंचनामा का केला जात नाही? असा सवाल तक्रारदार शेटगावकर यांनी पंचायत सचिवांना केला असता, ज्या बांधकामाविरुद्ध तुम्ही तक्रार केली,

त्यानुसार त्या बांधकामाचा पंचनामा केला. इतर बांधकामांचा पंचनामा करायचा असेल तर तशी वेगळी तक्रार आली तर त्याचाही पंचनामा करू, असे पंचायत सचिवांनी सांगितले.

मागच्या महिन्यात काही नातेवाईकांसह किनारी भागात जाण्यासाठी रस्त्यावर वाहन पार्क करून गेलो होतो. त्यावेळी या बांधकाम व्यावसायिकाने आम्हाला अपशब्द वापरले.

त्याने ‘तुम्हाला जे करायचे ते करा, सीआरझेड कायदा आमच्या हातात आहे’ असे सांगितल्यानंतर मी या बांधकामाविरोधात मोरजी पंचायतीकडे तक्रार केली आहे. - शिवनाथ शेटगावकर, तक्रारदार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT