Shankar Mahadevan Singer | Music Festival In Goa
Shankar Mahadevan Singer | Music Festival In Goa Dainik Gomantak

Shankar Mahadevan: ‘दिल चाहता है’ म्हणजे गोवा! शंकर महादेवन यांनी जागवल्या गोव्याच्या आठवणी

Goa: शैक्षणिक संस्थांनी खेळाच्या गुणांप्रमाणे संगीतासाठीही विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले पाहिजेत, अशी आग्रही मागणी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी केली आहे.
Published on

Goa Music: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जगभरातील संगीतापेक्षा वेगळे, वरचढ आणि अद्वितीय आहे. मात्र, त्याच्या प्रचार-प्रसारासाठीची साधना आणि साधनसुविधा कमी पडत आहेत. शैक्षणिक संस्थांनी खेळाच्या गुणांप्रमाणे संगीतासाठीही विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले पाहिजेत, अशी आग्रही मागणी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांनी केली.

कदंब पठारावरील गेरा स्कूल येथे आयोजित गेरा चाईल्ड सेंट्रिक होम्ससह ‘मीट द लिजेंड’ या मालिकेत ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘गेरा स्कूल’चे संस्थापक कुमार गेरा, दिया गेरा, श्रीधरन रंगनाथन सहभागी झाले.

महादेवन म्हणाले की, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला मोठी परंपरा आहे. ते एकूणच संगीताचे मूळ आहे. त्यामुळे त्याला दुय्यम ठरवता येणार नाही. गोव्यालाही संगीताची मोठी परंपरा आहे. मात्र, सध्या ती परंपरा खंडित होते की काय? अशी स्थिती आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

Shankar Mahadevan Singer | Music Festival In Goa
Mahadayi Water: कन्नड महासंघ म्हादई संघर्षात उतरणार; म्हादईसाठी गोव्याची मागणी योग्यच!

‘दिल चाहता है’ म्हणजे गोवा!

गोव्याच्या आठवणी जागवताना महादेवन म्हणाले की, गोव्याला संगीताची जशी परंपरा आहे, तशीच चित्रपट निर्मिती आणि चित्रीकरणाचीही परंपरा आहे. गोवा म्हटले की ‘दिल चाहता है’ आठवतो. लता दीदी आणि पंडित अभिषेकी आठवतात. मात्र, ही परंपरा पुढे नेली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com