Corona Third Wave

 

Dainik Gomantak 

गोवा

Corona Third Wave: चिखली उपजिल्हा रुग्णालयात नियमांची पायमल्ली

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये काही खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. परंतु त्या उपाययोजनांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) पार्श्वभूमीवर चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये काही खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. परंतु त्या उपाययोजनांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. येथील रुग्ण नोंदणी काऊंटर इस्पितळाबाहेर हलविण्यात आले आहे. परंतु तेथे सामाजिक अंतरासंबंधी (Social Distance) योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. तसेच तेथे येणाऱ्या रुग्णांना व इतरांसाठी असलेली सॅनिटायझरची सोय दुसरीकडे आहे, त्यामुळे तिचा वापर होत नाही. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये (Chikhali Sub-District Hospital) येणाऱ्या रुग्णांना तेथील काऊंटरवर नावनोंदणी करावी लागत होती. परंतु त्यामध्ये बदल करून तेथील व्यवस्था इस्पितळाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली आहे. यासंबंधी पूर्वीच्या काऊंटरवर कोणतीही सूचना लिहण्यात न आल्याने रुग्ण पूर्वीच्या काऊंटरसमोरच नावनोंदणीसाठी उभे राहतात. तेथे नावनोंदणी होत नसल्याचे त्यांना काहीवेळाने कोणीतरी सांगितल्यावर त्यांची धावपळ उडते.

ज्या ठिकाणी नावनोंदणी होते त्या ठिकाणी रुग्णांनी सामाजिक अंतरपाळावे यासाठी लक्ष ठेवण्यासाठी कोणीच उपस्थित नसतो. त्यामुळे रुग्ण रांगेत राहतात, पण त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर नसते. ग्रामस्थ सॅनिटायझरचा वापर न करता रुग्ण रांगेत उभे राहतात. महिला व पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगा येथे नजरेस पडत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रांगही महिला व पुरुष रांगेच्या अतिशय जवळ आहे. तसेच कोविड चाचणीसाठी (Corona Test) येणारेही तेथेच उभे राहतात. त्यामुळे प्रवेशद्वारासमोर गर्दी दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT