तुळशीदास फळदेसाई यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणूक लढण्यास सज्ज

तृणमूल काँग्रेस पक्षाशी युती केल्याने समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी मगो पक्षश्रेष्ठींच्या परवानगी घेऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला
Tulshidas Phaldesai

Tulshidas Phaldesai

Dainik gomantak

Published on
Updated on

दाबोळी मतदारसंघातील समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी (दि.6) जानेवारी 2022 रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पणजी येथे गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तृणमूलचे डॉ. सौरभ चक्रवर्ती व ओम प्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत त्यांना प्रवेश देण्यात आला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारिवर आता येणारी विधानसभा निवडणूक लढण्यास फळदेसाई सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दाबोळी मतदार संघातील (constituency) नेते प्रेमानंद उर्फ बाबू ना नोस्ककर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर दाबोळी मतदार संघातील समाजसेवक तथा मगोचे कार्यकर्ते तुळशीदास फळदेसाई यांनी पक्षाच्या उमेदवारीवर आपला दावा केला होता. तसेच गेल्या सहा महिन्यापासून मगो पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालू होते. तसेच त्याचे समाज सेवेचे काम चालू होते. मात्र मगो पक्षश्रेष्ठींनी दाबोळी मतदारसंघात आपला उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे जाहीर करताच तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाशी युती केल्याने समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी मगो पक्षश्रेष्ठींच्या परवानगी घेऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

<div class="paragraphs"><p>Tulshidas Phaldesai</p></div>
Goa Police: तब्बल 25 पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती

दरम्यान चिखली उत्तर डोंगरी येथील रहिवासी तथा युवा उद्योजक तुळशीदास फळदेसाई (Tulshidas Phaldesai) यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधला असून आज त्याने तृणमूल काँग्रेस मध्ये कायदेशीररित्या प्रवेश केला व फळदेसाई यांनी आता तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. फळदेसाई यांनी आपली समाज सेवा अविरत बजावताना जनतेच्या चांगल्या कामासाठी सदैव पुढाकार घेतला आहे. उत्तर डोंगरी, चिखली भागात राहून त्यांनी आपले कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वी फळदेसाई आणि चिखली पंचायत निवडणूक लढवून आपल्या समाजसेवेचा दबदबा कायम ठेवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. दाबोळी, चिखली, बोगमाळो, वाडे भागातील नागरिकांनी तुळशीदास फळदेसाई यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

<div class="paragraphs"><p>Tulshidas Phaldesai</p></div>
गोव्यातील भाजप नेत्यांच्या पुत्रांच्या दाव्यावरून तापणार राजकारण

पक्षात प्रवेश केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तुळशीदास फळदेसाई यांनी आपण मगो पक्षश्रेष्ठींच्या परवानगीनुसार आज तृणमूल काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला असून मगो व तृणमूल काँग्रेस युती झाल्यानेच हे शक्य झाले. तसेच दाभोळी मतदार संघात मगोची उमेदवारी नसल्याने आता मी तृणमूलच्या पक्ष चिन्हावर निवडणूक (election) लढवण्यास तयार आहे. तृणमूल प्रवेश म्हणजे मनोत माझे अस्तित्व नाही असे नाही. मी मगो पक्षाच्या बळावरच ही निवडणूक लढण्यास सज्ज आहे. पक्षाची तसेच तृणमूल (Trinamool) काँग्रेसची एकनिष्ठ राहून मी माझे पक्षासाठी पुढील कार्य अविरत चालू ठेविन असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com