तळे कोणाचे धार्मिक संस्थेचं की? मुरगाव नगरपालिकेचं

मुरगाव नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वास्को वाडे येथील तळ्याचे 14 कोटी रुपये खर्चून राज्य नगरविकास संस्था मार्फत सुशोभीकरण करण्यात आले
Murgaon lake

Murgaon lake

Dainikgomantak

Published on
Updated on

वास्को वाडे तळ्याची देखरेख करण्याची जबाबदारी मुरगाव नगरपालिकेची की राज्य नगरविकास संस्था (सुडा) यांची ती सर्वप्रथम येणाऱ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. जेव्हा वाडे तळे सुडातर्फे सुशोभीकरण करण्यात आले, तेव्हापासून येथे मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळ संध्याकाळच्या सत्रात चालणे, धावणे असा व्यायाम करीत आहे. मात्र काही शिक्षित नागरिक तळ्यावर चालण्याचे निमित्त साधून चक्क आपल्या घरातील पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात.

यामुळे इतर चालणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच काही पालक आपल्या मुलांना चालण्याच्या जागेवर सायकल चालवून येथील नियमाचे उल्लंघन करीत आहे. यासाठी वाडे तळ्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने या प्रकरणी त्वरित कारवाई करून पाळीव कुत्र्या बरोबर सायकल चालविणाऱ्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी स्थानिकांनी तसेच चालण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ व इतर नागरिकांकडून होत आहे.

<div class="paragraphs"><p>Murgaon lake </p></div>
कार शोरुममध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

मुरगाव (Mormugao) नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वास्को वाडे येथील तळ्याचे 14 कोटी रुपये खर्चून राज्य नगरविकास संस्था मार्फत सुशोभीकरण करण्यात आले. तर त्याचे लोकार्पण झाले तरी त्याची देखरेख (सुडा) करणार की मुरगाव नगरपालिका (Municipality) हे मात्र सामान्य नागरिकांना समजू शकले नाही. वाडे तळ्याचे सुडातर्फे सुशोभीकरण झाल्यानंतर अनेक वाद विवाद येथे निर्माण झाले. तळे कोणाचे येथील धार्मिक संस्थेचे की? हे पालिका संचालकाने वास्को वाडे वासियांना स्पष्टपणे सांगावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाडे तळ्याचे सुशोभीकरण झाल्यानंतर येथे जेष्ठ नागरिका बरोबर युवकांना चाळण्या बरोबर धावण्यासाठी ट्रेक उभारून देण्यात आले. त्याच्या चारही बाजूने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी स्टीलच्या खुर्च्या बसवण्यात आल्या. चतुर्थीच्या गणेश विसर्जनासाठी चांगली सोय करुन देण्यात आली. यामुळे वाडे तळ्याचे सौंदर्य फुलून दिसत आहे.

वास्को वाडे तळ्याचे सुशोभीकरणानंतर येथे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांबरोबर युवा महिला वर्ग सकाळ संध्याकाळच्या सत्रात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी चालण्यासाठी येऊ लागले. पण काही शिक्षित नागरी चक्क सकाळच्या संध्याकाळच्या सत्रात चालण्यासाठी येताना आपल्या घरातील पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात.

<div class="paragraphs"><p>Murgaon lake </p></div>
...तर म्हापसा गोव्यातील मोठं शहर होणार! : मुख्यमंत्री

वाडे तळ्याच्या चालण्याच्या जागेवर पाळीव कुत्र्यांना किंवा जनावरांना येणे बंदी असून सुद्धा मुद्दामून काही नागरिक पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. तसेच काही शिक्षित पालक आपल्या मुलांना सायकल वरून येथे फेरफटका मारण्यासाठी घेऊन येतात. यामुळे चालण्यासाठी येणाऱ्या कुत्र्यापासून व सायकल चालकांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी संबंधित विभागाने वाडे तळ्यात कुत्र्यांना व सायकल चालकावर बंदी घालावी.

तसेच जनावरांना व सायकल चालकावर येथे बंदी असल्याचा फलक लावावा. अन्यथा एखाद्या पाळीव कुत्र्याने चालण्यासाठी येणाऱ्याला चावा घेतला तर येथे प्रकरण वाढू शकते. तसेच मुले सायकल चालवताना कोणाला अपघात झाला तर दुर्घटना होऊ शकते. यासाठी संबंधित विभागाने त्वरित या विषयी उचित पावले उचलून, पोलिसांना निवेदन सादर करून, वाडे तळ्यावर चालण्यासाठी येताना कुत्रा किंवा सायकल चालवल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश जारी करावा. दाबोळी चिखली जॉगर्स पार्क येथे सुद्धा पूर्वी काही शिक्षित नागरिक (Citizen) पाळीव कुत्र्यांना घेऊन चालत होते. नंतर चिखली पंचायतीने त्यांना बंदी आणली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com