Protest Dainik Gomantak 
गोवा

पश्‍चिम बगल रस्त्याबाबत ग्रामस्थ आंदोलन करणार

पेडा, बाणावलीवासीयांचा पाईपलाईनला विरोध

दैनिक गोमन्तक

सासष्टी: पश्‍चिम बगल रस्ता व मलनिस्सारण पाइपलाइन संबंधी पेडा, बाणावलीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी बैठक घेतली व यासंबंधी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्टिल्टशिवाय पश्‍चिम बगल रस्त्याला आमचा विरोध आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोलवा येथील सांडपाणी प्रक्रिया प्लॅंट ते साळ नदीपर्यंतच्या जमिनीखालील पाईपलाईनलाही आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आम्ही दक्षिण गोवा खासदार फ्रांसिस सार्दिन यांची भेट घेणार असून हे प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आग्रह करण्यात येणार आहे, असे जिल्हा पंचायत सदस्य हांझेल फर्नांडिस, रॉयला फर्नांडिस व रॉक फर्नांडीस यांनी सांगितले. खासदार सार्दिन यांनी भेट निश्र्चित केली आहे, असे रॉक फर्नांडिस याने सांगितले. तसेच आमदार वेन्झी व्हिएगश यांनी सुद्धा नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला असल्याचे हेन्झल फर्नडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT