बेलाबाय उडी येथील घरे राहतील सुरक्षित!

दाजी साळकर: रेल्वे दुपदरीकरणात एकाही घराची हानी होणार नाही
Daji Salkar
Daji Salkar
Published on
Updated on

वास्कोे: वास्कोतील बेलाबाय परिसरातील उडी येथे सुरू असलेल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामात कोणत्याही घराचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन वास्कोचे भाजपचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी दिले. संयुक्त पाहणीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी उपायुक्तांसह रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी दत्तराज गौस देसाई, प्रभाग नगरसेवक गिरीश बोरकर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाचा दुपदरीकरण प्रकल्पाच्या कामात उडी बेलाबाय येथील घरे सुरक्षित राहतील, याची खात्री करून घेण्यासाठी आमदार साळकर यांनी दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरण, मुरगाव उपजिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना घेऊन संयुक्तरित्या पाहणी केली. येथील घरे सुरक्षित रहावीत,या दृष्टीने रेखांकन (मार्कींग) करण्यात आले आहे. रेल्वे दुपदरीकरणाबरोबरच या भागात चांगले पदपथ आणि रस्ता उपलब्ध करण्याचे पाहणीवेळी रेल्वे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असून त्यांनी ते मान्य केल्याची माहिती आमदार साळकर यांनी दिली.

Daji Salkar
Pramod Sawant Swearing-in Ceremony Live Update: गोव्यात भाजपचे सरकार स्थापन

रेल्वेचा विस्तार केला तर घरे पाडली जातील,या भीतीने त्रस्त रहिवाशांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. कारण रेल्वेची मालमत्ता त्यांच्या दारापर्यंत आहे. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार समस्या देखील सोडवल्या आहेत. आम्ही आता रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की घरांच्या अगदी जवळ जाऊ नका, कारण रेल्वेच्या पायलिंगच्या कामामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते, आणि प्रत्येक घरापासून एक मीटरचे बफर अंतर सोडण्यास सांगितले आहे,असे साळकर म्हणाले

"उडी बेलाबाय येथील घरांच्या सुरक्षेसाठी आम्ही आधीच खबरदारी घेतली आहे. रहदारीसाठी अंतर्गत रस्ता रुंद करण्यास सांगितले आहे, त्यानंतर सखल भागात पूर येऊ नये म्हणून क्रॉस ड्रेन आणि शेवटी एक फूटपाथ तयार करण्याची मागणी केली आहे. आत्तापर्यंत घरे वाचली आहेत आणि त्या बदल्यात आम्हाला रुंद रस्ता, फूटपाथ आणि क्रॉस ड्रेन मिळाला आहे, तर रेल्वेला त्यांचे विस्तारीकरण करावे लागेल, असेही साळकर म्हणाले.

Daji Salkar
केरी सरकारी विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

तान्या हॉटेल शेजारी रस्त्याच्या दुतर्फा शेत आणि तलाव आहे. शहरातील पावसाचे पाणी या तलावात यायचे आणि स्वातंत्र्य मार्गावर पूरस्थिती उद्‍भवायची.पूर येऊ नये म्हणून आम्ही खासगी प्रायोजकत्वाखाली पावसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी नवीन क्रॉस ड्रेन घेतले आहेत आणि या उडी भागातील हे नवीन क्रॉस ड्रेन असतील,असे साळकर म्हणाले दरम्यान, प्रभागातील नगरसेवक गिरीश बोरकर यांनी सांगितले की, अंतर्गत रस्त्याचे काम करण्यासाठी रेल्वेने रस्ता बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

रेल्वेने 80 मीटरपर्यंत भिंत बांधली होती आणि ती आता 100 मीटरपर्यंत वाढवायची आहे. सध्याच्या भिंतीलगत रस्ता असल्यामुळे हे शक्य होणार नाही. एक महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करून कोणत्याही घराचे नुकसान न करण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले,असेही बोरकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com