Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Vijai Sardesai: लोकांना न्याय देण्यास पाठ फिरवली तर लोकांच्या विधानसभेत हे प्रश्न मांडण्यात येतील आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्यात येईल, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला.

Sameer Amunekar

फोंडा: येत्या विधानसभा अधिवेशनात आमचे प्रश्न सरकारने ऐकून घेण्यास नकार दिला, लोकांना न्याय देण्यास पाठ फिरवली तर लोकांच्या विधानसभेत हे प्रश्न मांडण्यात येतील आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्यात येईल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.

फोंड्यात बुधवारी (ता.९) फोंडा आणि धारबांदोडा भागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या विधानसभेत मांडण्यासाठी ‘आमचो आवाज विजय’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी हा इशारा दिला.

यावेळी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच नीळकंठ नाईक तसेच सत्ताधारी गटाचे इतर पंचसदस्य, पंचसदस्य अकबर मुल्ला, ॲड. हृदयनाथ शिरोडकर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. वरचा बाजार - फोंड्यातील विठ्ठल रखुमाई सभागृहात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

फोंडा - धारबांदोडा भागातील वाहतूक समस्या, फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळातील गैरसुविधा, मार्केट विषय, पार्किंग तसेच मलनिस्सारण सुविधेचा बोजवारा, रस्ते वीज पाणी तसेच रोजगारासह अनेकांनी विविध समस्या मांडल्या. त्यातील बहुतांश समस्यांची नोंद करण्यात आली असून विधानसभा अधिवेशनात हे प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन विजय सरदेसाई यांनी दिले.

संजीवनीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा

धारबांदोडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सरकार दिशाभूल करीत असून संजीवनी बंद पाडली आहे. मात्र, अजून ठोस धोरण जाहीर होत नाही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यामागे सरकारचा छुपा अजेंडा असून संजीवनीची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा विचार सत्ताधारी करीत असल्याचे विजय सरदेसाई म्हणाले.

‘त्यांना’ घरी पाठवूया

फोंडा तालुक्यात तीन मंत्री आहेत. मात्र, लोकांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत, उलट वाढतच आहेत. म्हणून तालुक्याच्या विकासाकडे व नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या मंत्र्यांना आधी घरी पाठवूया, असे आवाहन विजय सरदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT