Goa Health Department
Goa Health DepartmentDainik Gomantak

Goa Health Department: राज्यातील आरोग्य व्यवस्था होणार बळकट; डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका भरतीस सरकारची मान्यता

Goa Health Department Recruitment: आरोग्य खात्यात डॉक्टर व कर्मचारी मिळून १६० जण आणि १०० परिचारिका कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Published on

पणजी: आरोग्य खात्यात डॉक्टर व कर्मचारी मिळून १६० जण आणि १०० परिचारिका कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सरकारी साहाय्यक वकिलांच्या १६ जागाही भरण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयांची माहिती दिली.

यावेळी त्यांच्यासोबत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालयात १० हून अधिक जागा कंत्राटी पद्धतीने तर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात काही जागा भरण्यात येणार आहेत. पर्यावरण खात्यातही तांत्रिक जागा भरण्यात येणार आहेत.

Goa Health Department
Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

तुये येथील सामाजिक आरोग्य केंद्र परिसरातील ८०० चौरस मीटर जागा केंद्र सरकारला हस्तांतरीत केली जाणार आहे. त्या ठिकाणी संसर्गजन्य नसलेल्या आजारांची तपासणी केंद्र सरकार उभारणार आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोगाचे प्राथमिक लक्षण, श्वसनविकार, स्थूलता, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यावर निदान व उपचार होतील. प्रारंभिक टप्प्यात आजार शोधणे, जोखीम घटकांचे मूल्यांकन करणे (उदा. धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती), रुग्णांचे योग्य निदान व मार्गदर्शन आदी कामे या केंद्राच्या माध्यमातून होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com