Goa Cabinet Decision: गोव्यात रॉटव्हिलर, पिटबुल कुत्र्यांवर बंदी घालण्यासाठी विधेयक; आंबेडकर भवनसाठी जागा मंजूर, मंत्रिमंडळाचे 10 महत्वाचे निर्णय

Goa Cabinet Decision: २१ जुलै ते ०८ ऑगस्ट या काळात गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.
Goa government moves to ban Rottweiler and Pitbull dog breeds
Goa Cabinet DecisionsDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोव्यात रॉटव्हिलर, पिटबुल कुत्र्यांवर बंदी घालण्यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे. तसेच, राज्यात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पर्वरीत २,०४० चौरस मीटर जागा मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याशिवाय विविध महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय

१) Ease Of Doing Business साठी मंत्री माविन गुदिन्हो यांच्या दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार

२) गोवा लोकसेवा आयोगाचा अहवाल २०२४ -२५ मंत्रिमंडळासमोर सादर केला असून, तो अधिवेशनात मांडला जाईल.

३) आरोग्य खात्यात नवीन भरती (१७० डॉक्टर आणि नर्स यांची कंत्रीटी भरती)

४) रॉटव्हिलर आणि पिटबुल यासारख्या पाळीव श्वानांवर बंदीबाबत निर्णय घेण्यासाठी विधेयक सादर केले जाणार

५) बाबासाहेब आंबेडकर भवनसाठी पर्वरीत २,०४० चौ. मीटर जागेची मंजुरी

Goa government moves to ban Rottweiler and Pitbull dog breeds
पुण्यातील पर्यटकाची गोव्यात गुंडगिरी; सुरक्षा रक्षकाला कारखाली चिरडून खून करण्याचा प्रयत्न

६) गोवा दंत महाविद्यालयातील विविध पदांसाठीच्या भरतीसाठी मान्यता (१० कंत्राटी डॉक्टर)

७) पर्यावरण व हवामान बदल खात्यात नव्या पदाच्या निर्मितीस मान्यता

८) एनसीडीएससाठी तुये येथे जागेसाठी मंजुरी

९) बंदर कप्तान व नदी परिवहन आता वेगवेगळी खाली असतील

१०) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) या स्वतंत्र विभागाची स्थापना

Goa government moves to ban Rottweiler and Pitbull dog breeds
Varsha Usgaonkar: 'गोव्याची पोरगी, तू इथे कशी?' चक्क बाळासाहेबांच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; वाचा मजेदार किस्से

गोवा वाहतूक अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप बाबत काही निर्णय घेण्यात आला का याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळी राज्यातील टॅक्सी चालक आणि सरकार एकाच पानावर असून, योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, २१ जुलैपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होईल, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com