Congress Leader Vijay Bhike Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत; विजय भिके

Goa Government Job: गोवा भरती आणि रोजगार सोसायटी व गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत ठेवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government Job: गोवा भरती आणि रोजगार सोसायटी व गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत ठेवली जात आहे. आठ ते दहा वर्षे काम करणाऱ्यांचे वेतन न वाढवता नव्याने घेतलेल्यांना चार ते पाच हजार रुपये अधिक वेतन दिले जात आहेत.

कंत्राटी पद्धतीने भरती करणारी अशा दोन-दोन वेगवेगळी महामंडळे कशासाठी? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांताक्रूझ गट समितीचे जॉन नाझारेथ, प्रणव परब यांची उपस्थिती होती. ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांचे वेतन वाढवावे, अशी प्रमुख मागणी आहे. सोसायटीतर्फे काम करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून एकाच वेतनावर काम करावे लागत आहे.

परंतु सरकारच्या कागदोपत्री त्यांचे वेतन सुमारे 19 हजार रुपये आहे आणि त्यांच्या हातात सुमारे दहा हजार रुपये दिले जातात. शिवाय त्यांना त्यांचे पगारही वेळेवर मिळत नाहीत. आठ ते नऊ हजार रुपये वेतन कपात केले जातात. दुसऱ्या बाजूला गोवा मानव संसाधन विकास महामंडळात कंत्राटी पदांवरील कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये अतिरिक्त रक्कम दिली जात आहे. हा विरोधाभास कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.

अधिकारी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत

जॉन नाझारेथ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जुलै २०२२ मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२२ मध्ये वेतन समान करण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते, परंतु काहीही झाले नाही. दीड वर्षे झाले तरी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत, हेच यावरून दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT