vijai sardesai meets karnataka deputy Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिण गोव्यात राजकीय खलबतं! आमदार विजय सरदेसाईंनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट

Vijai Sardesai Meets Karnataka Deputy: गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. डी.के. शिवकुमार दक्षिण गोवा दौऱ्यावर असताना रात्रीच्या मुक्कामादरम्यान सरदेसाई यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

राजकीय दृष्टिकोनावर सविस्तर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट केवळ एक औपचारिक सदिच्छा भेट असली, तरी या दोन्ही नेत्यांमध्ये राज्याच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. उभय नेत्यांनी सध्याची बदलती राजकीय स्थिती आणि विविध राजकीय दृष्टिकोनांवर (Political Viewpoints) आपले विचार मांडले. सरदेसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या भेटीची माहिती देताना ही चर्चा अत्यंत विधायक आणि सकारात्मक झाल्याचे नमूद केले.

भेटीचे टायमिंग आणि महत्त्व

डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे (Congress) बडे नेते आणि कर्नाटकचे प्रभावशाली उपमुख्यमंत्री आहेत, तर विजय सरदेसाई हे गोव्यातील प्रबळ विरोधी आवाज मानले जातात. दक्षिण गोव्यातील दौऱ्यावर शिवकुमार मुक्कामाला असताना झालेली ही भेट आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. गोव्यातील स्थानिक प्रश्न आणि शेजारील राज्यांशी संबंधित मुद्द्यांवरही यावेळी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

राजकीय तर्कवितर्क

या भेटीमुळे गोव्यातील (Goa) राजकीय समीकरणे बदलणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेषतः दक्षिण गोव्यातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरदेसाई यांनी या भेटीला 'सौजन्य भेट' असे संबोधले असले, तरी दोन मातब्बर नेत्यांच्या एकत्रित येण्याने सत्ताधारी गोटात मात्र भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच परतणार; अग्निकांड आणि ZP निवडणुकीनंतर CM सावंतांनी गाठली दिल्ली

SCROLL FOR NEXT