Peoples Path Project Dainik Gomantak
गोवा

Peoples Path Project: 'संपूर्ण खर्च स्वतः केला, सरकारकडून एक रुपयाही घेतला नाही'; विजय सरदेसाईंचे स्पष्टीकरण

Vijay Sardesai Statement: ‘पीपल्स पाथ’च्या उद्‌घाटनाला जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्‍या पायाखालची वाळू सरकली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: ‘पीपल्स पाथ’च्या उद्‌घाटनाला जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्‍या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकल्पाबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. २०२२ पासून आपल्‍या मतदारसंघात मंजूर झालेल्या एकाही विकासकामाचे उद्‌घाटन मंत्र्यांच्या हस्ते झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘पीपल्स पाथ’च्या कार्यक्रमासाठी सरकारने मनोरंजन शोवर एक रुपयाही खर्च केलेला नाही. संपूर्ण खर्च मी स्वतः केला असून स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनीही विनामोबदला योगदान दिले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

मंत्री असताना मडगावमध्ये हेरिटेज स्ट्रीट उभारण्याची कल्पना मांडली होती. त्यानंतर पर्यटन महामंडळाकडे पाठपुरावा करून प्रकल्प पूर्ण केला. हा कार्यक्रम अधिकृत सरकारी उद्‌घाटन सोहळा नव्हता आणि त्यातून स्वतःची जाहिरात करण्याचा हेतूही नव्हता, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

स्वतःची जाहिरात करायची नव्हती

उद्‌घाटन करताना मी तिथे माझ्या नावाची पाटी लावलेली नाही. मला या प्रकल्पातून माझी स्वतःची जाहिरात करायची नव्हती. हा प्रकल्प अधिक सुंदर व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्‍यासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत आहे, असे सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती कायम राहणार की जागावाटपात बदल होणार? दामू नाईक म्हणाले, 'मतभेद नाहीत'!

Goa Politics: पक्षातून निलंबन, पोलिसांत तक्रारी अन् अखेर माफी; शविना शिरोडकर प्रकरणी अजय खोलकरांच्या अडचणी वाढल्या!

Horoscope 4 November 2026: व्यवसायातून बक्कळ कमाई आणि छप्परफाड धनलाभ! 'या' राशींवर कुबेराची कृपा; आर्थिक समृद्धीचा आजचा दिवस

POCSO Case: सामान्य आरोपीला अटक, मग पोलीस अधिकाऱ्याला वेगळी वागणूक का? पोक्सो प्रकरणी गोम्स यांचा सवाल!

खरी कुजबुज: जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

SCROLL FOR NEXT