Goa Politics: पक्षातून निलंबन, पोलिसांत तक्रारी अन् अखेर माफी; शविना शिरोडकर प्रकरणी अजय खोलकरांच्या अडचणी वाढल्या!

Shavina Shirodkar Apology: ‘‘खोलकर यांनी आपल्‍याबाबत आक्षेपार्ह वक्तव्‍ये करून राज्‍यातील महिलांचा अपमान केला आहे.
Shavina Shirodkar Apology
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षाच्‍या प्रदेशाध्‍यक्ष शविना शिरोडकर यांच्‍याबाबत केलेल्‍या आक्षेपार्ह वक्तव्‍यांमुळे ‘आरजी’ने निलंबित केलेले अजय खोलकर अडचणीत आले आहेत. त्‍यांच्‍याविरोधात मडगाव, कळंगुट पोलिस स्‍थानकांत पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्‍या आहेत. त्‍यानंतर खोलकर यांनी शविना यांची माफी मागितली आहे.

‘‘खोलकर यांनी आपल्‍याबाबत आक्षेपार्ह वक्तव्‍ये करून राज्‍यातील महिलांचा अपमान केला आहे. खोलकर हे गोव्‍याच्‍या राजकारणाला लागलेला डाग असून, तो वेळीच पुसून टाकावा, अशा शब्‍दांत शविना यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्‍यक्त केला.

Shavina Shirodkar Apology
Goa Transport Rules: गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालक, बसमालकांच्या संरक्षणासाठी मोटार वाहन नियम बदला; ताम्हणकरांची मागणी

काहीच दिवसांपूर्वी मडगाव येथे पत्रकारांनी विचारलेल्‍या एका प्रश्‍‍नाचे उत्तर देताना, खोलकर यांनी प्रदेशाध्‍यक्ष शविना शिरोडकर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. याबाबतचा व्‍हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्‍यानंतर ‘आरजी’च्‍या राज्‍यभरातील पदाधिकाऱ्यांमध्‍ये संताप निर्माण झाला. पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेश बोरकर यांनीही याबाबत खोलकर यांच्‍यावर सडकून टीका केली.

त्‍यानंतर शविना शिरोडकर यांच्‍यासह दक्षिण गोवा समितीने मडगावात, तर शिवोली गट समितीच्‍या कार्यकर्त्यांनी खोलकरांविरोधात कळंगुट पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल केली. यावरून रोष वाढल्‍याने खोलकर यांनी सोशल मीडियाद्वारे शविना शिरोडकर यांची माफी मागितली.

त्‍यानंतर मंगळवारी सायंकाळी पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत शविना यांनी खोलकर यांचा समाचार घेतला. ‘‘गोव्‍यासह देशभरात महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. आपल्‍यासारख्‍या युवतीला प्रदेशाध्‍यक्ष करून आरजीने राज्‍यभरातील महिला, युवतींचा सन्‍मान केला, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

खोलकर हे राजकारणाला लागलेला डाग : शविनांची टीका

ही वृत्ती आत्ताच ठेचली पाहिजे पक्षांतर्गत वाद सुरू असताना आम्‍ही कधीही अजय खोलकर यांची पत्‍नी किंवा त्‍यांच्‍या मुलीला मध्‍ये ओढलेले नाही. आता खोलकर स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी त्‍यांचा ढाल म्‍हणून वापर करत आहेत. राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांबाबत अशी वक्तव्‍ये करून खोलकर आणि त्‍यांचे साथीदार महिलांचा आत्‍मविश्‍‍वास कमी करत आहेत. गोव्‍याच्‍या राजकारणाला लागलेले ते डाग आहेत. ही वृत्ती आत्ताच ठेचली पाहिजे, असे शविना म्‍हणाल्‍या.

Shavina Shirodkar Apology
Goa Police Suspension: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

काँग्रेसकडूनही अजय खोलकर यांच्‍या वक्तव्‍याचा निषेध

शविना शिरोडकर यांच्‍याबाबत केलेल्‍या आक्षेपार्ह वक्तव्‍यांप्रकरणी काँग्रेसनेही अजय खोलकर यांचा निषेध नोंदवला. महिला काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्ष प्रतीक्षा खलप यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत, खोलकर यांची वक्तव्‍ये खेदजनक असून त्‍यांच्‍यावर कारवाई व्‍हावी, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.