

पणजी: भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) यांच्यात कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमधील युती कायम राहणार की जागावाटप कसे होणार, याचा अंतिम निर्णय भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजप-मगो युतीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असताना नाईक यांनी दोन्ही पक्षांत वाद नसल्याचे सांगितले. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे युतीचे भवितव्य आणि जागावाटपाचे सूत्र केंद्रीय नेत्यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही युती झालेली हवीच आहे.आम आदमी पक्षाच्या गोव्यातील आश्वासनांवर टीका करताना नाईक म्हणाले की, हा पक्ष केवळ आश्वासने देण्याचे काम करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.