Unemployment Rate At Goa Canva
गोवा

गोव्यातील युवक हताश! एकीकडे दुप्पट Unemployment Rate तर दुसरीकडे पैसे घेऊनच नोकरी; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

Goa Unemployment Rate: सरकारने गोव्‍याच्‍या युवकांबद्दल अशी अनास्‍था दाखविल्‍यास गोव्‍याच्‍या युवकांमध्‍ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि तसे झाल्‍यास गोव्‍यासाठी ते घातक ठरेल असेही सरदेसाईंनी सांगितले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Unemployment Rate News

मडगाव: गोव्‍यातील बेरोजगारीची टक्‍केवारी राष्‍ट्रीय टक्‍केवारीपेक्षा दुप्‍पट असल्‍याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून यावरुन गोव्‍यातील बेरोजगारी कमी करण्‍यास गाेवा सरकारला पूर्णत: अपयश आले आहे हे स्‍पष्‍ट होेते, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून सरकारने गोव्‍यातील युवकांना अक्षरश: वाऱ्यावर सोडून दिले आहे. आणि भविष्‍यात हा एक मोठा समस्‍येचा विषय बनू शकतो अशी भीती त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

गोव्‍यातील (Goa) सरकारकडे बेरोजगारी कमी करण्‍याची मानसिकताच उपलब्‍ध नसून त्‍यांच्‍याकडे त्‍यासाठी कार्यपध्दतीही नाही. एकाबाजूने गोव्‍यातील फार्मा उद्योग आपली नाेकरभरती बाहेरच्‍या राज्‍यातून करत असून यावर उपाय म्‍हणून गोव्‍यातील युवकांना रोजगार देण्‍याची सक्‍ती करण्‍याचा कायदा आणला जाईल असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगूनही विधानसभा संपल्‍यानंतर त्‍यादृष्‍टीने काहीच झालेेले नाही.

दुसऱ्याबाजूने कामगार मंत्र्यांच्‍या कार्यालयातून गोव्‍यातील युवकांना नोकऱ्या देण्‍यासाठी पैसे मागितले जातात. यामुळे गोव्‍यातील युवक निराश झाले असून ते रोजगाराच्‍या शोधासाठी राज्‍य सोडून दुसरीकडे जात आहेत, असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

सध्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांकडे बेरोजगारी कमी करण्‍यासाठी कुठला दृष्‍टिकोनच उपलब्‍ध नाही, असा आरोप करताना गोव्‍याचे पहिले मुख्‍यमंत्री दयानंद बांदाेडकर यांनी गोमंतकीय युवकांना राेजगार मिळावा यासाठी झुआरी ॲग्राे कंपनीला गोव्‍यातील ५० लाख चौ.मी. जागा प्रति चौ.मी. २५ पैसे या दराने दिली. मात्र, सध्‍याच्‍या सरकारने हीच जमीन त्‍या कंपनीला औद्योगिक विभागातून वगळून सेटलमेंट विभागात बदलून दिली आहे.

जेणेकरुन ही कंपनी गोव्‍याबाहेरील धनाढ्यांसाठी घरे उपलब्‍ध करून देऊ शकणार आहे. ज्‍याचा गोव्‍याच्‍या युवकांना रोजगार मिळण्‍यासाठी काडीचाही फायदा होणार नाही. सरकारने गोव्‍याच्‍या युवकांबद्दल अशी अनास्‍था दाखविल्‍यास गोव्‍याच्‍या युवकांमध्‍ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि तसे झाल्‍यास गोव्‍यासाठी ते घातक ठरेल, असेही त्‍यांनी सांगितले आहे.

सरकार रोजगार निर्मिती करण्यास असमर्थ; पालेकर

गोव्यात देशाच्या तुलनेत अधिक बेरोजगारी असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. गोव्यात ८.७ टक्के बेरोजगारी आहे. गोवा सरकार रोजगार निर्मिती करण्यास, नवीन उद्योग आणण्यास असमर्थ ठरले आहे, असे ‘आप’नेते अमित पालेकर यांनी सांगितले. ते पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ‘आप’चे वाल्मिकी नाईक, सलमान खान उपस्थित होते. दरम्यान पालेकर म्हणाले, दिल्ली सरकारच्या बेरोजगारीच्या तुलनेत गोव्यात चार पट अधिक बेरोजगारी आहे. गोव्यात सरकारी नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. आज जरी सरकारी भरती आयोग लागू केला असला तरी देखील नोकर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT