Science Day Program
Science Day Program Dainik Gomantak
गोवा

Science Day: सिंबॉयसीस शाळेच्या विज्ञानदिन स्पर्धेत विद्या वृद्धी प्रथम

गोमन्तक डिजिटल टीम

Science Day शिरोडा येथील स्कूल ऑफ सिंबॉयसीस विद्यालयात विज्ञानदिन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने साजरा झाला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमात सलग तीन वर्षे देशाचे ज्येष्ठ वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या स्मृतीनिमित्त फिरता चषक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदाच्या या चषकाचे मानकरी फोंड्यातील विद्या वृद्धी माध्यमिक विद्यालय ठरले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाला रिबिल्ड ट्रस्टचे अध्यक्ष अभय भामईकर व गोवा विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक श्रीवल्लभ कामत हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. इतर मान्यवरांत विद्यालय समिती सदस्य सचिन शिरोडकर, मुख्याध्यापक बेंजामीन रोचा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन शिरोडकर तसेच श्रीवल्लभ कामत यांनीही या विज्ञानदिनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुलांचा उत्साह वाढला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विज्ञानावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

त्यात शिरोडा, फोंडा व कुडचडे भागातील एकूण अकरा शाळांनी भाग घेतला. डेफोडिल्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या दिवशी वेगवेगळे प्रयोग सादर केले व दर्शकांची शाबासकी मिळवली. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रिचा जोशी यांनी केले तर शिक्षक अनुप नाईक यांनी आभार मानले.

विज्ञानदिन हा फक्त एक दिवस न करता तो पूर्ण आठवडाभर साजरा करावा. त्यामुळे मुलांमध्ये काहीतरी नवीन प्रकल्प साकारण्यासाठी उत्साह निर्माण होईल. विज्ञानाच्या दिशेने विद्यार्थ्यांची ही पाऊलवाट ठरली पाहिजे.

- अभय भामईकर, अध्यक्ष , रिबिल्ड ट्रस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT