Bondla Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Sanctuary: 'बोंडला'साठी पशुवैद्यकीय अधिकारी नेमणार, प्राणी दगावल्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

Bondla Wildlife Sanctuary: गोवा सरकारने प्राणी आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कंत्राटी तत्त्वावर पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेल्या बोंडला अभयारण्यातील प्राणीसंग्रहालयातील काही प्राण्यांचा अलीकडेच संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, गोवा सरकारने प्राणी आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कंत्राटी तत्त्वावर पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

बोंडला प्राणी संग्रहालय हे गोव्याच्या पर्यावरणीय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असून, तेथे वाघ, बिबटे, सांबर, हरिण, माकडे, रानडुक्कर, पक्षी व सर्प या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केले जाते. मात्र, मागील काही महिन्यांत काही प्राण्यांमध्ये विषाणूजन्य संसर्ग आढळून आला होता. त्यातून काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.

त्यामुळे बोंडला येथील प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी, वन विभाग अधिकारी व सामाजिक संस्थांकडून केली जात होती.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, या नव्या नियुक्तीमुळे प्राणी आरोग्य तपासणी, लसीकरण, आहार नियंत्रण, आणि रोग निदान यासारख्या बाबी अधिक प्रभावीपणे हाताळता येणार आहेत. हा अधिकारी कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात येणार असला तरी भविष्यात स्थायी नियुक्तीबाबतही विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. वनखात्याच्या मते, जंगलातील प्राण्यांना कमी त्रास होईल, वेळेत उपचार मिळतील.

सुव्यवस्थापनासाठी उपाययोजना

गोवा सरकारने बोंडला प्राणी संग्रहालयाच्या सुव्यवस्थापनासाठी आणखी काही उपाययोजना हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. यात प्राण्यांच्या अधिवासांचे नूतनीकरण, निगा राखण्याचे यंत्र अधिक सक्षम करणे, तसेच वन्यजीव प्रशिक्षकांची भरती करणे यांचा समावेश असू शकतो.

राज्य सरकारचा निर्णय वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानला जात असून, गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालयाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT