Bhandari Samaj Goa: भंडारी समाजाच्‍या दोन गटांत जात प्रमाणपत्रावरून जुंपली, उपेंद्र गावकर यांच्या समितीची मानवाधिकार आयोगाकडे धाव

Caste Certificate Dispute Goa: कोणत्या समाज संघटनेने दिलेले प्रमाणपत्र जात प्रमाणपत्रासाठी वैध, यावरून गोमंतक भंडारी समाजातील दोन गट सध्या समोरासमोर आले आहेत.
Bhandari Samaj Goa
Bhandari Samaj GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोणत्या समाज संघटनेने दिलेले प्रमाणपत्र जात प्रमाणपत्रासाठी वैध, यावरून गोमंतक भंडारी समाजातील दोन गट सध्या समोरासमोर आले आहेत. देवानंद नाईक यांची सही असलेला समाज दाखला सरकारी यंत्रणा जात प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरू लागल्याने उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.

जात प्रमाणपत्रासाठी सक्तीने समाज दाखला देण्याची अट लादल्यामुळे अनेक पात्र अर्जदारांना अन्यायकारक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे, असा दावा त्यांनी आयोगासमोर केला आहे.

समाजकल्याण खाते आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही काही तालुक्यांमधील उपजिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून समाज प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. त्यामुळे पात्र ओबीसी अर्जदारांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

Bhandari Samaj Goa
Goa Crime: दोघांमध्ये प्रेम असं की, 'दो दिल... एक जान', काहीतरी बिनसले अन् प्रियकरानं गोव्याच्या बीचवर संपवलं जीवन

फोंडा येथील स्नेहा नाईक या भंडारी नाईक या भंडारी समाजाच्या सदस्याला जातीचा दाखला नाकारण्यात आला. त्यांनी गोमंतक भंडारी समाजाकडून समाज प्रमाणपत्र घेतले होते, यावरून एका प्रतिस्पर्धी संघटनेने आक्षेप घेत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली.

फोंड्यात बोगस सर्टिफिकेटचा दावा

फोंडा : फोंडा, शिरोडा, प्रियोळ आणि मडकई भागातील भंडारी बांधवांना बोगस सर्टिफिकेट अज्ञातांकडून दिली जात असून भंडारी बांधवांनी अशी सर्टिफिकेट न घेता समाजाच्या कार्यालयाशी संपर्क साधून सर्टिफिकेट घ्यावीत, अशी सूचना गोमंतक भंडारी समाजाचे हेमंत नाईक यांनी म्हटले आहे. यासंबंधीची पत्रकार परिषद नागझर -कुर्टी येथील दादी नाईक यांनी दिलेल्या कार्यालयात घेतली. त्यावेळी हेमंत नाईक यांच्यासमवेत अनिल नाईक, दादी नाईक, सुनील नाईक आदी उपस्थित होते.

Bhandari Samaj Goa
Goa GMC Issue: "तू मंत्र्यांचो चमचो" आंदोलक डॉक्टरांचा डीनविरोधात भडका; हमरीतुमरीमुळे CM सावंतही झाले अवाक!

भंडारी समाजाच्या मागण्या अशा

  • जात प्रमाणपत्रासाठी समाज प्रमाणपत्राची सक्ती तात्काळ रद्द करावी.

  • अशा बेकायदेशीर आक्षेपांमागे कोण आहे, याची सखोल चौकशी व्हावी.

  • कोणत्याही अर्जदाराशी संघटनात्मक संलग्नतेवरून भेदभाव केला जाऊ नये.

  • जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून पारदर्शकता सुनिश्चित करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com