Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Goa Assembly Monsoon Session 2025: नागरिक देखील कसलीही चौकशी न करता १, २ लाख रुपये ऑनलान पद्धतीने पाठवतात. त्यांनी असे करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Pramod Yadav

पर्वरी: ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा मुद्दा कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी शून्य काळात उपस्थित केला. कुडचडेसह राज्यात अनेक नागरिक सायबर चोरट्यांचे टार्गेट होत असून, त्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे काब्राल म्हणाले. याबाबत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना महत्वाचे आवाहन केले.

निलेश काब्राल यांनी कुडचडे येथील एका नागरिकाची ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे सभागृहात सांगितले. सायबर चोरट्यांनी व्यक्तीला फोन करुन सायबर गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे काब्राल म्हणाले. याप्रकरणी व्यक्तीने कुडचडे पोलिस स्थानकांत दाखल झाला असता त्याला रायबंदर येथे पाठविण्यात आले. यामुळे तक्रारदाराला त्रास सहन करावा लागला, असे काब्राल म्हणाले.

स्थानिक पोलिस स्थानक पाच लाखांच्या खालील तक्रार दाखल करुन घेत नाहीयेत. अशा तक्रारी दाखल करुन घ्याव्यात, असा मुद्दा काब्राल यांनी उपस्थित केला.

याबाबत पोलिस महासंचालकांना सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून, पुन्हा एकदा त्यांना सांगतो, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच, गोमंतकीयांसाठी मुख्यमंत्र्यांनी सायबर घटनांबाबत खास आवाहन देखील केले.

मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केले?

नागरिकांना अनोळखी फोन येतो, त्यांना कोणाला तरी अटक करण्यात आलीय, कोणतातरी गुन्हा गुन्ह्यात नाव आलंय अशी माहिती देऊन भीती दाखवली जाते. नागरिक देखील कसलीही चौकशी न करता १, २ लाख रुपये ऑनलान पद्धतीने पाठवतात. त्यांनी असे करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गोवा लहान राज्य आहे, अशी काही घटना घडल्यास नागरिकांना आमदार, स्थानिक पोलिस एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना फोन करुन असे काही घडलंय का? याबाबत चौकशी केली जाऊ शकते. पण, अनेकजण भीतीपोटी लगेच पैसे पाठवतात, असे करु नका! असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी समस्त गोमंतकीयांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa News: आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

SCROLL FOR NEXT