Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Moths Of India: पतंग (moth) फुलपाखरांसारखेच दिसतात पण ते निशाचर (रात्री विहार करणारे) असतात. सूर्यास्त झाल्यानंतर, कातरवेळेला त्यांचा दिवस सुरू होतो.
Moths Of India
Moths Of IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पतंग (moth) फुलपाखरांसारखेच दिसतात पण ते निशाचर (रात्री विहार करणारे) असतात. सूर्यास्त झाल्यानंतर, कातरवेळेला त्यांचा दिवस सुरू होतो. रात्रीच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रजातीचे पतंग विहार करताना आढळतील. रात्री बारा वाजल्यानंतर आकाराने मोठ्या असलेल्या पतंगांचा रात्रक्रम सुरू होतो. 

पतंगदेखील फुलपाखरांसारखेच परागीकरणात आपली भूमिका बजावत आलेले आहेत.‌ फुलांमधील मधुरसावर त्यातील अनेक जण जगत असतात. पतंगांची संख्या फुलपाखरांपेक्षा कितीतरी पटीने खूप अधिक आहे. परिसंस्थेत रात्री बाहेर पडणाऱ्या अनेक पशुपक्ष्यांसाठी पतंग हे खाद्य असते. त्यामुळे पतंग हे जीवांच्या खाद्यचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहेत

दुर्दैवाने पतंगांबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे शिवाय त्यांच्याबद्दल अनेक गैरसमजुतीही आहेत. दिवसा विहार करणाऱ्या पशुपक्ष्यांबद्दल, फुलपाखरांबद्दल खूप अभ्यास झालेला आहे. मात्र रात्री बाहेर पडणाऱ्या विविध जीवांबद्दल अजूनही हवा तसा अभ्यास झालेला नाही.

पतंग कुठल्या झाडांवर अंडी घालतात, त्यांच्या अळ्या (कुसुंडे) कुठल्या झाडांच्या पानांवर जगतात यांची माहिती त्यांच्या खूप कमी प्रजातींबद्दल उपलब्ध आहे. त्याशिवाय विशिष्ट प्रजातींचा नेमका वावर कुठल्या भागात असतो याबद्दलही फारसा अभ्यास झालेला नाही.

गोव्यात किंबहुना पूर्ण भारतात पतंगांच्या कुठल्या प्रजाती आढळतात याची परिपूर्ण यादीही बनवली गेलेली नाही. फुलपाखरांचे जीवन चक्र (अंडी, सुरवंट, कोष, फुलपाखरू) आपल्या सर्वांना ठाऊक आहे मात्र पतंगांच्या जीवनचक्राचे दस्तऐवजीकरण झालेले नाही. 

हवामान बदलाचा परिणाम पतंगांवरही झाला आहे मात्र तो नेमक्या कशा प्रकारचा आहे याचीही माहिती तयार झालेली नाही.

Moths Of India
Moths in Goa: मान्सूनमध्ये कदंबाच्या झाडावर रात्री फुलांचा रस पिणारे, एकच आठवडा जगणारे एटलास मोथसारखे 'गोव्यातील पतंग'

उदाहरणार्थ, हवाबदलामुळे समुद्र पातळीवर अस्तित्वात असलेल्या पतंगांनी स्वतःचे स्थलांतर समुद्र पातळीपासून अधिक उंचावर केले आहे काय वगैरेबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहे. शहरीकरणामुळे जे प्रकाश प्रदूषण झालेले आहे त्याचाही परिणाम पतंगांच्या अस्तित्वावर झालेला आहे.

त्यांची सामान्य जीवनशैली त्यामुळे बिघडून गेलेली आहे. आकाशातील नैसर्गिक प्रकाशावर त्यांचा विहार अवलंबून असतो. मात्र आजकाल रात्री वापरात असलेल्या शुभ्र 'एलईडी' प्रकाशामुळे त्यांचा विहार धोक्यात आलेला आहे.

Moths Of India
Apefly Butterfly: अद्भुत! गोव्यातील वांते गावात आढळले 'वानरमुखी फुलपाखरू'

पतंग जरी फुलपांखरासारखे आकर्षक आणि दिवसाच्या सौंदर्यात भर घालणारे नसले तरी आपल्या परिसंस्थेत त्यांना महत्वाचे स्थान आहे हे आपण विसरता कामा नये. 

आदित्य काकोडकर

ज्येष्ठ समन्वयक, सागरी संवर्धन विभाग डब्ल्यूडब्ल्यूएफ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com