
आजच्या बदलत्या काळात आपण पाहतो आहोत की मुलांना फास्ट फूड ,सॉफ्ट ड्रिंक, चिप्स, बर्गर ,पिझ्झा अशा खाद्यपदार्थांचे वेड लागले आहे. विद्याप्रसारक विद्यालयातील मुलांनी गोव्यातील पावसाळी रानभाज्यांचा आनंदाने घेतलेली आस्वाद म्हणूनच दखल घेण्याची बाब होती.
त्या दिवशी इयत्ता सातवीतील सर्व मुलांनी आपापल्या घरून विविध प्रकारच्या पौष्टिक पावसाळी रानभाज्यांचे विविध पदार्थ बनवून आणले होते. कुर्डूची भाजी, टाकळ्याची भाजी, तेरे, अळू, शेवग्याच्या पानांची भाजी, करटूलांची (फागला) भाजी, वालीच्या पानांची भाजी, फणसाची भाजी अशा विविध पौष्टिक भाज्यांचा त्यात समावेश होता.
पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या अत्यंत पौष्टिक असतात. यात विविध जीवनसत्वे असतात ज्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपल्याला पोषण मिळते, ज्यामुळे पावसाळ्यात होणारे विविध आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. अशी माहिती शाळेतील विज्ञान शिक्षिका कुमारी हर्षा नाईक हिने मुलांना दिली.
त्यानंतर सर्व मुलांनी आणि शिक्षिका रिमा हरमलकर नाईक, मंदा शेटगावकर यांनी स्वतः बनवून आणलेल्या सर्व भाज्यांचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे कधीही भाज्या न खाणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या दिवशी आनंदाने त्यांचा आस्वाद घेतला.
मुलांना आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या अनेक रानभाज्यांची ओळख व्हावी, या भाज्यातून शरीराला मिळणाऱ्या पोषक तत्वांची माहिती त्यांना मिळावी व त्याचबरोबर मुलांना या भाज्या खाण्याची सवय लागावी या उद्देशाने शाळेचा इको क्लब आणि तिथी भोजन यांच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला होता.
रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.
रानभाज्यांमध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
काही रानभाज्या विशिष्ट आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत, जसे की सर्दी, खोकला आणि ताप.
रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात, त्यामुळे त्या रासायनिक खतांचा वापर न करता वाढतात.
रानभाज्या आपल्या आहारात विविधता आणतात.
रानभाज्या नैसर्गिकरित्या वाढतात, त्यामुळे त्यांचे उत्पादन पर्यावरणास हानिकारक नसते.
मात्र रानभाजी निवडताना आणि वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, कारण काही रानभाज्या विषारी असू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.